पाणी पातळी ०.७२ मीटरने खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 01:09 AM2017-11-24T01:09:01+5:302017-11-24T01:09:43+5:30

यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील बहूतांश भागात अल्प पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यात वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सरासरी पाणी पातळी ०.७२ मीटरने खालावल्याचे ....

Water level decreased by 0.72 m | पाणी पातळी ०.७२ मीटरने खालावली

पाणी पातळी ०.७२ मीटरने खालावली

Next
ठळक मुद्देसमुद्रपूर अन् हिंगणघाटात धोका अधिक

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील बहूतांश भागात अल्प पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यात वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सरासरी पाणी पातळी ०.७२ मीटरने खालावल्याचे समोर आल्याचे चिंता वाढली आहे. सर्वेक्षणात हिंगणघाट तालुक्यातील वडनेर, खापरी, धानोरा आणि समुद्रपूर तालुक्यातील नंदोरी, बर्फा, सावंगी (झाडे) भागातील पाणी पातळी सर्वाधिक खोल गेल्याची नोंद झाली आहे. यामुळे या गावात येत्या दिवसात पाणी टंचाई भेडसावल्यास नवल वाटणार नाही.
जुन ते सप्टेंबर या कालावधीत ९२०.७१ मि.मी. पर्जन्यमान अपेक्षीत असताना यंदा ७६४.२६ मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. सरासरीच्या तुलनेत यंदा १५६.४५ मि.मी. पाऊस कमी झाला. यामुळे पाण्याच्या पातळीत घट होणे अपेक्षित होते. मात्र झालेली घट मोठी असल्याचे भूजल विभाग चांगलात चिंतेत पडला आहे. पाऊस कमी झाल्याने जलसाठेही कोरडे पडले आहेत. परिणाती रबी हंगामाकरिता शेतकºयांना धरणातून नाही तर त्यांच्याकडे असलेल्या विहिरींतून पाणी घ्यावे लागत आहे. होत असलेल्या या उपस्यामुळे पाण्याच्या पातळीत आणखीच झपाट्याने घट होत असल्याचे समोर आले आहे. येत्या उन्हाळ्याच्या दिवसात जल संकटाला तोंड देण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात एकूण ३९ पाणलोट क्षेत्रात ११२ निरीक्षण विहिरी आहेत. त्याचे सर्वेक्षण नुकतेच भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या माध्यमातून झाले आहे. आॅक्टोंबर ते डिसेंबर या कालावधीत पाणीटंचाई निर्माण होणार नाही असे वरिष्ठांना दिलेल्या अहवालात नमुद केले आहे; परंतु, उन्हाळ्याच्या दिवसात कुठल्या कुठल्या भागाला जल संकटाचा सामना करावा लागेल याचे चित्र जानेवारी महिन्यात स्पष्ट होईल असे सांगण्यात आले आहे.

पर्जन्यमानाची तीन तालुक्यातील तूट २४ टक्के
गत वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाला आहे. जुन ते सप्टेंबर या कालावधीत ९२०.७१ मी.मी. पर्जन्यमान अपेक्षीत असताना यंदा केवळ ७६४.२६ मी.मी. पर्जन्यमान झाले. समुद्रपूर, देवळी व आष्टी तालुक्यात यंदा पर्जन्यमानातील तुट सुमारे २४ टक्के असल्याचे सांगण्यात आले.
जलयुक्त शिवार योजनेने दिला आधार
जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे कामे झाली आहेत. सन २०१५-१६ मध्ये २१२ गावांची निवड करून ३ हजार ३००, सन २०१६-१७ मध्ये २१४ गावांची निवड करून २ हजार २४४ कामे करण्यात आली. तर यंदाच्या वर्षी ६७ गावांची निवड करून तेथे १३८ जलसंधारणाची कामे केली जाणार आहेत. मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवाय योजनेची जिल्ह्यात कामे झाल्यामुळे यंदाच्या अल्प पाऊसाचा सध्यातरी परिणाम जाणवत नसल्याचे जानकारांचे म्हणणे आहे. खºया अर्थाने यंदा जलयुक्त शिवार योजनेंतगत झालेल्या जलसंधारणांच्या कामांनीच जिल्ह्याला आधार दिला आहे.
काही ठिकाणी वाढ तर काही ठिकाणी घट
यंदाच्या सप्टेंबर महिन्यामधील पाण्याच्या पातळीची गत पाच वर्षांशी तुलना केली असता १४ पाणलोट क्षेत्रामध्ये सरासरी १ ते २ मिटरने पाणी पातळीत घट आढळून आली आहे. १९ पाणलोट क्षेत्रामध्ये सरासरी ०.५ ते १ मिटर घट आढळून आली आहे. शिवाय सहा पाणलोट क्षेत्रात पाणी पातळीत सरासरी ०.५ ते १ मिटरने वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. पाणी पातळीत वाढ झालेल्यात कारंजा तालुक्यातील डब्लू. आर. के. १, के. २, जे ४ व आर्वी तालुक्यातील डब्लू. आर. व्ही.२, डब्लू. आर. व्ही.३ तसेच हिंगणघाट तालुक्यातील डब्लू. आर. २३ निरीक्षण विहिरीचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.
 

Web Title: Water level decreased by 0.72 m

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी