सदोष बांधकामामुळे पाण्याची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 11:08 PM2018-11-12T23:08:16+5:302018-11-12T23:08:35+5:30

निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्याचे नियोजनानुसार बांधकाम झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना पाणीपुरवठा होत नाही. परिणामी मोझरी (शेकापूर) परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे याची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. शेतकऱ्यांना सिंचन करता यावे व चांगले उत्पादन घेता यावे म्हणून प्रशासनाने वर्षात दोनवेळा पाणी पुरवठा करण्याचे जाहीर केले होते.

Water damage due to faulty construction | सदोष बांधकामामुळे पाण्याची वानवा

सदोष बांधकामामुळे पाण्याची वानवा

Next
ठळक मुद्देमोझरीच्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा : जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्याचे नियोजनानुसार बांधकाम झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना पाणीपुरवठा होत नाही. परिणामी मोझरी (शेकापूर) परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे याची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शेतकऱ्यांना सिंचन करता यावे व चांगले उत्पादन घेता यावे म्हणून प्रशासनाने वर्षात दोनवेळा पाणी पुरवठा करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार पहिले पाणी सतत २२ दिवस सोडण्यात आले. परंतु यातील एकही दिवस पाणी मोझरी (शेकापूर) या गावातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नाही. कालव्याला पाणी सोडल्याच्या दिवसापासून साठ तासात पाणी मोझरी या गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वरुड, खानगांव या गावात पोहचले. तसेच सर्वच दिवस आवश्यकतेपेक्षाही जास्त पाणी पुरवठा या गावांमध्ये झाला. पण, मोझरीपर्यंत पाणी का येत नाही, या पाठपुरावा शेतकºयांनी केला असता खानगाव ते कापशी दरम्यान कालव्याचा पुर्ण उतार काढला नाही तसेच कालाव्याची रुंदी व लांबी याचा ताळमेळ जुळलेला नसल्याचे आढळून आले. म्हणूनच हा कालवा पूर्ण झाल्यापासून तर आजच्या दिवसापर्यंत पाण्याचा एकही थेंब मोझरीवासीयांच्या नशीबी आला नाही. त्यामुळे या कालाव्याच्या बांधकामाची चौकशी करुन मोझरीतील शेतकऱ्यांना नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन देताना संदिप वरखडे, प्रवीण वनकर, खेमचंद चिमणे, संदेश उमरे, परशांता मुंजेवार, गजानन काकडे व सुरेश पारिसे उपस्थित होते. या निवेदनावर गावातील ५८ जणांच्या स्वाक्षरी आहेत. या निवेदनाच्या प्रतिलीपी खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, निम्न वर्धा कार्यालय, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, वर्धा पंचायत समितीचे बांधकाम सभापती यांनाही देण्यात आले आहे. आता प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.
अधिकाऱ्यांकडून होतेय टाळाटाळ
निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर कालव्याने ते मोझरी (शेकापूर) गावापर्यंत पोहचत नाही. सोडलेले पाणी मोझरीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांमध्ये भरपूर प्रमाणात उलब्ध होते. यासदर्भात संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता धरणात पाणी उपलब्ध नसल्याने पाणी पुरवठा होऊ शकत नाही, अशी उत्तरे दिली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जर धरणात पाणी नाही तर बाकी गावांना पाणीपुरवठा कुठून होतो, असा प्रश्न उपस्थित झाल्याने शेतकºयांनी पाणी न येण्यामागचे कारण शोधून काढले. तेव्हा कालव्याचे बांधकामच सदोष असल्याचे आढळून आले.

Web Title: Water damage due to faulty construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.