२१,५८२ शेतकऱ्यांना बोंडअळीच्या मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 11:36 PM2018-04-25T23:36:04+5:302018-04-25T23:36:04+5:30

गत खरीप हंगामात कपाशीवर बोंडअळीने मोठ्या प्रमाणावर आक्रमण केले होते. यामुळे सर्वच स्तरावर मदत देण्याची ओरड झाली होती. परिणामी, शासनाने शेतकºयांना हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली.

Waiting for 21.582 farmers to help the bandwidth | २१,५८२ शेतकऱ्यांना बोंडअळीच्या मदतीची प्रतीक्षा

२१,५८२ शेतकऱ्यांना बोंडअळीच्या मदतीची प्रतीक्षा

Next
ठळक मुद्देअहवाल कधीचाच सादर : शासनाकडून निकष जाहीर; पण अनुदान नसल्याने मदत नाही

सुरेंद्र डाफ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : गत खरीप हंगामात कपाशीवर बोंडअळीने मोठ्या प्रमाणावर आक्रमण केले होते. यामुळे सर्वच स्तरावर मदत देण्याची ओरड झाली होती. परिणामी, शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली. यात सर्वच शेतकऱ्यांना मदत देण्याचे निकष ठेवण्यात आले होते; पण नवा खरीप तोंडावर आला असताना एकाही शेतकऱ्याला जुन्या हंगामातील नुकसानीची मदत मिळाली नाही.
शेतकऱ्यांचे मुख्य पीक असणाऱ्या कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने त्यांची आर्थिक घडी विस्कटली. यात ३३ टक्क्यांच्या वर नुकसान झालेल्या कपाशी पिकांना मदत देण्याचे शासनाने जाहीर केले. या निकषात तालुक्यातील २१ हजार ५८२ शेतकरी येत असून त्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. या निकषाचा सरसकट सर्वच शेतकऱ्यांचा लाभ व्हावा यासाठी महसूल व कृषी विभागाच्यावतीने संयुक्त सर्व्हे करण्यात आला. यात शासनाने २३ फेब्रुवारी व त्यानंतर १७ मार्च २०१८ रोजी काढलेल्या अध्यादेशात नव्याने पैसेवारीची अट रद्द केली. यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्याची अपेक्षा आहे.
नव्या अध्यादेशात शासनाने दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. यात आता कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रतीहेक्टर ६ हजार ८०० रुपये तर ओलीतासाठी १३ हजार ५०० रुपयांची मदत मिळणार आहे. शासनाने बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली; पण या मदतीची अंमलबजावणी पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांना आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादकांना मदतीची घोषणा ही शासनस्तरावरील आहे. याबाबत नव्याने अध्यादेश काढून सर्वच शेतकºयांना याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्नरत आहे. शेतकऱ्यांना अद्याप मदतीबाबतची सूचना व निर्णय प्राप्त झाला नाही.
- सतीश सांगळे, उपविभागीय कृषी अधिकारी, आर्वी.

Web Title: Waiting for 21.582 farmers to help the bandwidth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस