केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी घेतली पुलगाव दारुगोळा स्फोटातील पीडितांच्या कुटुंबीयांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 02:39 PM2018-11-21T14:39:46+5:302018-11-21T14:40:27+5:30

सोनेगाव आबाजीजवळ पुलगाव दारुगोळा भांडारात बॉम्ब निष्क्रिय करतांना झालेल्या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या परिवारांची केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी बुधवारी  भेट घेतली.

Union Home Minister Hansraj Ahir has visited Pulgaon blast victims' families | केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी घेतली पुलगाव दारुगोळा स्फोटातील पीडितांच्या कुटुंबीयांची भेट

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी घेतली पुलगाव दारुगोळा स्फोटातील पीडितांच्या कुटुंबीयांची भेट

googlenewsNext

वर्धा -  सोनेगाव आबाजीजवळ पुलगाव दारुगोळा भांडारात बॉम्ब निष्क्रिय करतांना झालेल्या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या परिवारांची केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी बुधवारी  भेट घेतली.  यावेळी खासदार रामदासजी तडस व जिल्हाध्यक्ष राजेश बकाने हे उपस्थित होते.

अहीर यांनी सर्वप्रथम शालिनी ताई मेघे सुपर स्पेशालिटि हॉस्पिटल येथे कालच्या अपघातातील गंभीर जखमी लोकांची भेट घेतली व त्यांची विचारपूस केली.   या प्रसंगी माझी खासदार दत्ताजी मेघे व रुग्णालयाचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे यांनी गंभीर जखमी रुग्णांच्या उपचारा संदर्भात माहिती दिली, या प्रसंगी श्री हंसराज अहिर म्हणाले पुलगाव सी.ए.डी. कॅम्प हा देशातला महत्वाचा कॅम्प असून या घटनेची केंद्र सरकार कडून कसून चौकशी करून दोषींन वर गंभीर कारवाई केली जाईल व मृतक परिवारांना केंद्र शासन कडून भरीव मदत केली जाईल. 

यानंतर मा. मंत्री महोदय यांनी सोनेगाव आबाजी या गावात जाऊन मृतकांच्या परिवाराची प्रत्यक्ष भेट घेतली व कॅम्प लगत च्या या गावात बॉम्ब फुटल्या मुळे होत असलेल्या सतत च्या समस्यांची हि चर्चा केली
गुंजखेड जिल्हापरिषद सदस्या सौ वैशाली येरावार व जयंत येरावार यांनी मृत परीवाराणा केंद्र शासन कडून भरीव मदत देण्याची मागणी केली या प्रसंगी गावकऱ्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी काल घटना होताच घटना स्थळी जाऊन जखमींना वर उपचार व जिल्हा प्रशासन च्या माध्यमातून जे काम केले त्या करीता गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.या प्रसंगी जबलपूर आयुध भांडरकडून मृतकांच्या परिवारांना आर्थिक मदतीचे वितरण मा. हंसराजजी अहिर व खासदार रामदास जी तडस , भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने व वैशालिताई येरावार यांनी केली. 

शेवटी मंत्री महोदयांनी काल अपघात झालेल्या स्थळाला भेट दिली तिथे पुलगाव सी.ए. डि. अधिकारी, जबलपूर कॅम्प चे अधिकारी, जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. पिंगळे व एस्. डि. ओ. वर्धा, ठाणेदार श्री. ठाकूर साहेब व जिल्हाप्रशासनाचे अनेक अधिकारी उपस्थित होते या प्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री राजेशजी बकाने यांनी कालच्या अपघातात सर्वश्री दोषी असलेल्या ठेकेदारावर गंभीर कारवाही करून मृतकांच्या परिवारांना व जखमींना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी केली. या प्रसंगी श्री. राहुल चोपडा, किशोर गव्हाळकर, प्रवीण सावरकर, प्रशांत इंगळे तिगावकार, समीर ढोक, गंगाधर राऊत इत्यादी लोक उपस्थित होते. 

Web Title: Union Home Minister Hansraj Ahir has visited Pulgaon blast victims' families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.