ठळक मुद्देरबीत हरभºयाचा पेरा वाढणार : खरिपाने दिला शेतकºयांना धोका

विजय माहुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : अस्मानी व सुल्तानी संकट झेलत खरीपातील पिकापासून अधिक उत्पन्न घेण्याची आशा धुळसर झाली आहे. त्यातच रबीच्या पिकातून आर्थिक बाजू मजबूत होईल ही आशा ठेऊन शेतकरी रबी हंगामाला सामोरे जात आहे. दोन वेच्यात कपाशीची उलंगवाडीचे चिन्हे दिसत असल्याने हरभºयाच्या पेºयात वाढ होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या वर्षी कापसाला प्रती किलो ४० ते ४२ रूपये भाव मिळत आहे;पण शेतकºयांना पहिल्या वेचणीला कापसाची मजूरी प्रती किलो २० रूपयेच मजूरांना द्यावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यात इतर खर्च पकडल्यास शितदहीचा वेचा शेतकºयांना न परवडणाराच ठरला. शेतकºयांच्या दृष्टीने दिवाळी बोनस म्हणून ओळख असलेल्या सोयाबीननेही यंदा शेतकºयांना धोका दिला. अनेक शेतकºयांना यंदा समाधानकारक उतारे न आल्याचे शेतकरी सांगतात. त्यातही सोयाबीनला सध्या दिल्या जाणारा भाव शेतकºयांची अडचण वाढविणाराच आहे. सोयाबीन पीक घेतल्यानंतर जमीनीतील ओलावा हरभरा या पिकासाठी उपयुक्त ठरणारा असल्याने तसेच बोर प्रकल्पाचे पाणी ओलितासाठी सोडण्यास विलंब दिसू लागल्याने बहुतांश शेतकºयांनी कुटुंबीयांची गरज भागविण्यापूर्ती गव्हाच्या पेरणीला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. तर काहींनी हरभºयाची लागवड केली आहे. परिणामी, यंदाच्या रबीत हरभºयाच्या पेºयात वाढ झाली आहे. कोरडवाहू शेतातील कपाशी दोन वेचणीतच उलंगवाडी होण्याची शक्यता शेतकºयांकडून वर्तविल्या जात आहे. सिंचनासाठी धरणाचे पाणी मिळाल्यास भुईमुंगाचीही लागवड बºयापैकी होईल असेही शेतकरी सांगतात.
कपाशीवरील लाल्याने वाढविली अडचण
यंदा सोयाबीन व कपाशी आधार देईल, अशी आशा शेतकºयांना असताना सोयाबीनने धोकाच दिला. सध्या कपाशीवर लाल्या या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकºयांची अडचण वाढली आहे. वन्यप्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी अनेक शेतकरी शेतातच रात्रीला मुक्काम करीत असून लाल्या या रोगामुळे उत्पादनात घट येण्याची भीती शेतकºयांकडून वर्तविली जात आहे.
वितरिकेच्या साफसफाईकडे दुर्लक्षच
शेतकºयांना शेतातील पिकांना वेळीच पाणी देता यावे या हेतूने बोर प्रकल्पाचे पाणी सोडल्या जाणार आहे. परंतु, वितरिकेची साफसफाई पाहिजे तरी न करण्यात आल्याने व त्यात काही भागात झुडपे वाढली असल्याने नियोजित वेळेत पाणी नियोजित ठिकाणापर्यंत पोहोचेल काय याबाबत उलट-सुलट परिसरात चर्चा होत आहे. मोजक्याच ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने वितरिका स्वच्छ करण्यात येत आहे. संपूर्ण वितरिका वेळीच स्वच्छ व दुरूस्त करण्याची मागणी आहे.
सिंचनासाठी मिळणार धरणाचे पाणी
बोर प्रकल्पात जलसाठा यंदा कमी असला तरी शेतकºयांना सिंचनासाठी पाणी दिले जाणार आहे. यंदा केवळ हरभरा पिकासाठी तीन पाळीत पाणी सोडले जाणार असून गव्हासाठी धरणाचे पाणी दिले जाणार नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे बोर प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून असणारा गव्हाचा पेरा यंदा कमी होण्याची शक्यता आहे. तर भुर्इंमुंग पेरणी पासूनही शेतकºयांना दूर रहावे लागणार आहे.