सालोड (हिरापूर) येथे होणार ‘ट्रान्सपोर्ट हब’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 11:40 PM2018-03-18T23:40:46+5:302018-03-18T23:40:46+5:30

'Transport Hub' to be set up at Salod (Hirapur) | सालोड (हिरापूर) येथे होणार ‘ट्रान्सपोर्ट हब’

सालोड (हिरापूर) येथे होणार ‘ट्रान्सपोर्ट हब’

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी मागविला प्रस्ताव : चालकांसह वाहकांना विश्रांतीसाठी निवाऱ्याची व्यवस्था

रूपेश खैरी।
ऑनलाईन लोकमत
वर्धा : गुड्स गॅरेजचा व्यवसाय करणाऱ्या अनेक वाहन मालकांकडून त्यांची वाहने रस्त्याच्या कडेला व त्यांच्या घरालगत उभी केली जातात. यामुळे शहरातील अनेक मार्गावर वाहतुकीची समस्या निर्माण होते. या समस्येवर मार्ग काढण्याकरिता उप प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने सालोड (हिरापूर) येथे ट्रान्सपोर्ट हब प्रस्तावित करण्यात आला आहे.
उपप्रादेशिक परिवहन विभागाचे परवाना देण्याकरिता आणि वाहने तपासणी करण्याकरिता एक केंद्र आहे. विस्तारित जागेत असलेल्या या केंद्राच्या इमारतीसह इतर बाबींना सध्या ‘ब्रेक’ लागला आहे. या केंद्रालगत शासनाची मोठी जागा असून सदर जागेवर ‘ट्रान्सपोर्ट हब’ निर्माण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाला दिल्या आहेत. तत्सम प्रस्तावही सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ही जागा जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येत असल्याने जिल्हाधिकारी यांच्याकडून हा प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाकडे येणार आहे. येथून मंजुरी मिळाल्यानंतरच या ‘ट्रान्सपोर्ट हब’चा मार्ग मोकळा होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर मंजूर झालेल्या हा ट्रान्सपोर्ट हब सुमारे पाच एकर जागेत विस्तारला जाणार आहे. येथे वाहनांच्या पार्किंगसह त्यांची दुरूस्ती, लोडींग-अनलोडींग करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर या ट्रान्सपोर्ट हबमध्ये वाहनांचे चालक आणि वाहकांकरिता निवाºयाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
सध्या हा ट्रान्सपोर्ट हब कागदावर प्रस्तावित असून त्याच्या मंजुरीची प्रतीक्षा अनेकांना लागलेली आहे. असा हब तयार झाल्यास वर्धेतील वाहतुकीची समस्या बºयापैकी मार्गी लागणार आहेत. शहरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांमुळे होणारे अपघातही यातून टळण्याची शक्यता आहे. या ट्रान्सपोर्ट हबमुळे वर्धेला नवीन ओळख लाभणार आहे.
पाच एकराच्या जागेवर होणार निर्माण
शहरालगत असलेल्या सालोड (हिरापूर) येथे तब्बल पाच एकराच्या विस्तीर्ण आवारात या ट्रान्सपोर्ट हबचे काम होणार आहे. या जागेत वाहनांचे पार्किंग, त्यांची दुरूस्ती आणि चालक व वाहकांसाठी विश्रांतीची सोय येथे करण्यात येणार आहे. एवढ्या मोठ्या जागेवर निर्माण होणाºया या ट्रान्सपोर्ट हबमुळे बºयाच समस्या मार्गी लागतील, असे बोलले जात आहे.
जिल्हा परिषदेकडे राहणार देखभाल दुरूस्ती
ज्या जागेवर हा ट्रान्सपोर्ट हब निर्माण करण्यात येणार आहे. ती जागा जिल्हा परिषदेच्या अधिकार क्षेत्रात येणार आहे. यामुळे येथे उभ्या राहणार असलेल्या इमारतीची आणि देण्यात येणार असलेल्या सुविधांची देखभाल करण्याची जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनाला पार पाडावी लागणार आहे.

Web Title: 'Transport Hub' to be set up at Salod (Hirapur)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.