वाघाचा हल्ला; वासरु जखमी, शेतकरी बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 10:32 PM2019-03-24T22:32:36+5:302019-03-24T22:33:25+5:30

शेतशिवारात जनावरे चारत असताना लपून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक वासरावर हल्ला चढविला. यात वासरु जखमी झाले असून शेतकऱ्यावर चाल करुन जाताच आरडाओड केल्याने वाघाने पळ काढल्यामुळे शेतकरी व इतर जनावरे बचावली.

Tiger attack; The calf wounded, the farmer escaped | वाघाचा हल्ला; वासरु जखमी, शेतकरी बचावला

वाघाचा हल्ला; वासरु जखमी, शेतकरी बचावला

Next
ठळक मुद्देसालई (पेवठ) शिवारात दोन दिवसांपासून वाघाचा मुक्काम

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरधरण : शेतशिवारात जनावरे चारत असताना लपून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक वासरावर हल्ला चढविला. यात वासरु जखमी झाले असून शेतकऱ्यावर चाल करुन जाताच आरडाओड केल्याने वाघाने पळ काढल्यामुळे शेतकरी व इतर जनावरे बचावली. ही घटना रविवारी बोर व्याघ्र प्रकल्पालगतच्या सालई (पेवठ) शिवारात घडली असून या शिवारात दोन दिवसापासून वाघ वास्तव्यास असल्याचे सांगितले जात आहे.
सालई (पेवठ) येथील शेतकरी पुरुषोत्तम सावरकर हे सकाळी १० वाजता गाय, बैल व वासरु चारायला गेले. जनावरे चरत असताना झुडपात लपून बसलेल्या पट्टेदार वाघाने वासरावर हल्ला चढविल्याने बाकी जनावरे इतरत्र पळाली. ही बाब पुरुषोत्तम सावरकर यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडओरड केली. त्यामुळे वाघ त्यांच्यावरही चाल करुन आला. तेवढ्यात आजुबाजुचे शेतकरीही धावून आल्याने पट्टेदार वाघाने पळ काढला. वाघाच्या हल्ल्या वासरु जखमी झाले. या घटनेची माहिती हिगणी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिल्यावर क्षेत्र सहाय्यक व वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाघाच्या दिशेने जात वाघाला हकलून लावले. वाघाच्या या वास्तव्यामुळे शेतात काम कसे करायचे व जनावरांना कसे चारायचे, असा प्रश्न उपस्थित करीत शेतकऱ्यांनी वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. त्यावर वन अधिकाऱ्यांनी जनावरे घरीच बांधून ठेवण्याचा सल्ला दिल्याने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.

वनविभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी अडचणीत
सालई (पेवठ) या परिसरात या पट्टेदार वाघाचे दोन दिवसांपासून वास्तव्य आहे. याबाबत हिंगणीच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना माहिती दिली. अधिकारी आले आणि पाहून निघून गेले; पण वाघाचा बंदोबस्त केला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या भागात नेहमीच वाघ व बिबट्याचे हल्ले होत असल्याने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Tiger attack; The calf wounded, the farmer escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.