पाणीदार गावासाठी खासदारांनी हाती घेतली टिकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:53 PM2018-05-19T23:53:18+5:302018-05-19T23:53:18+5:30

तालुक्यातील रसुलाबाद गटग्रामपंचायत मध्ये असलेल्या कंचनपूर या गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या गावात श्रमदानाच्या माध्यमातून जलसंवर्धनाची विविध कामे ग्रामस्थांच्या सहकार्याने केली जात आहेत.

Taking the MP for the watery village, Tikas | पाणीदार गावासाठी खासदारांनी हाती घेतली टिकास

पाणीदार गावासाठी खासदारांनी हाती घेतली टिकास

Next
ठळक मुद्देवॉटर कप स्पर्धा : कंचनपूर येथे केले ग्रामस्थांसह प्रत्यक्ष श्रमदान

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : तालुक्यातील रसुलाबाद गटग्रामपंचायत मध्ये असलेल्या कंचनपूर या गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या गावात श्रमदानाच्या माध्यमातून जलसंवर्धनाची विविध कामे ग्रामस्थांच्या सहकार्याने केली जात आहेत. श्रमदात्या ग्रामस्थांचा उत्साह वाढविण्यासाठी खा. रामदास तडस यांनी कंचनपूर येथे जावून स्वत: हातात टिकास व पावडे घेऊन प्रत्यक्ष श्रमदान केले.
कंचनपूर या गावात वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने श्रमदानाच्या माध्यमातून गावाला दुष्काळ मुक्त करण्यासाठी तरूण-तरूणींसह ग्रामस्थ विविध जलसंवर्धनाची कामे करीत आहेत. कंचनपूर हे गाव १०० टक्के आदिवासी समाज बांधव वास्तव्यास असलेले गाव असून या गावातील नागरिक शेती व शेती पुरक व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा गाढा ओढतात. या गावाला खा. रामदास तडस यांनी सदिच्छा भेट देऊन येथे राबविण्यात येणाऱ्या श्रमदान उपक्रमात सहभागी होऊन प्रत्यक्ष श्रमदान केले. यावेळी रसुलाबादच्या सरपंच राजश्री धारगवे, ग्रामसेवक अशोक बोबडे, विलास सावरकर, गजानन पिंगळे, हरिष पाटील, नितीन धाडसे, मंगेश सावरकर, दिनेश कुसराम, राजू मानकर, डॉ. लोकेंद्र दाभिरे, कल्पना उईके, साहेबराव वेळूकर, पांडुरंग मानकर, शंकर मानकर, रवी मानकर, राहुल सावरकर, सुरेश सावरकर, मंदा चोरांबे, अजाब मांगुळकर, विठ्ठल राऊत, विजय सावरकर, लुकेश सावरकर, चंद्रशेखर सावरकर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. त्यांनीही श्रमदान केले.
दुष्काळाला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे -तडस
पाण्याची बचत, पाण्याचा काटेकोरपणे वापर, व्यवस्थापन आणि प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर या सूत्रानुसार पाण्याचे नियोजन करणे ही काळाची गरज आहे. गावकऱ्यांनीही जलसंवर्धनाच्या या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे. सर्वसामान्य काय करू शकतो हे आज वॉटर कपच्या माध्यमातून दाखवून देण्याची वेळ आली आहे. नागरिकांनी सामूहिकपणे दुष्काळाला हद्दपार करण्यासाठी श्रमदानाच्या माध्यमातून प्रयत्न करावे, असे आवाहन यावेळी खासदार रामदास तडस यांनी केले.

Web Title: Taking the MP for the watery village, Tikas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.