कपाशीवर आलेल्या मर रोगाचा सर्वे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:52 PM2018-10-23T23:52:20+5:302018-10-23T23:52:52+5:30

कपाशीच्या पिकावर आलेल्या मर रोगाचा त्वरित सर्व्हे करून सरकारतर्फे पन्नास हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे वतीने करण्यात आली. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यास निवेदन देण्यात आले.

Survey the disease of dead disease on the cadaver | कपाशीवर आलेल्या मर रोगाचा सर्वे करा

कपाशीवर आलेल्या मर रोगाचा सर्वे करा

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादी कॉग्रेसची मागणी : वर्धा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : कपाशीच्या पिकावर आलेल्या मर रोगाचा त्वरित सर्व्हे करून सरकारतर्फे पन्नास हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे वतीने करण्यात आली. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यास निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, कपाशीच्या पिकावर सुरूवातील बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. खरीपाच्या हंगामात कपाशीच्या पिकावर पात्या, फुलातून सुरूवातीला बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे पात्या, फुले उलमळून पडली. त्यानंतर कपाशीच्या पिकावर लाल्याचा रोगा आला. त्यामुळे पाने लालसर झाले. झाडाचे देठ, पाने यांचेवर बुरशीचा प्रादुर्भाव होऊन झाडावर मर रोग आला. कपाशीचे पुर्ण झाड वाळून गेले. झाडावरील पाने लाल्याच्या रोगाने सुकून जावून वाळले. झाडावर असलेली लालसर रोगग्रस्त बोंडे जमिनीवर खाली पडली. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडलेला आहे. मागील ३ ते ४ वर्षाच्या दुष्काळामुळे त्रस्त झालेला शेतकरी संकटात सापडला आहे. सर्व्हे करावा आणि संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी बाजार समितीचे संचालक राजेश मंगेकर, विनोद वानखेडे, पं.स. सदस्य दशरथ नगराळे, संजय चौधरी, मोहन तिमांडे, प्रकाश वानखडे, शेषराव भोयर, कमलाकर भोयर, ज्ञानेश्वर कोल्हे, अमोल मेघरे, राष्ट्रपाल जवादे, वैद्य, राज नगराळे, गौतम वैद्य, विनोद उईके, दिवाकर मानकर, मधुकर कुटे, सुनील मून आदी उपस्थित होते.

Web Title: Survey the disease of dead disease on the cadaver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस