Sugarcane fire due to shot circuit in Wardha district, loss of 11 lakh | वर्धा जिल्ह्यात शॉट सर्कीटमुळे ऊसाला आग, ११ लाखांचे नुकसान

ठळक मुद्देउमरी येथील घटना भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शॉट सर्कीट झाल्याने उमरी येथे चार एकर शेतातील ऊसाला आग लागली. यात अकरा लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास येथे घडली.
उमरी येथील विजय आनंदराव पोफळे यांनी सर्वे क्र. ३ येथील २ हेक्टर शेतात ऊस लावला आहे. शेतातून गेलेल्या खांबांवरील तार लोंबकळत होते. याबाबत वीज वितरण कंपनीला वारंवार अर्ज व दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली; पण तार व्यवस्थित करण्यात आले नाही. यामुळे ही घटना घडली. डिसेंबर महिन्याच्या अंतिम आठवड्यात या ऊसाची कापणी केली जाणार होती. आगीमध्ये चार एकरातील ऊस जळून खाक झाला. यात सुमारे ७ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. शेतातील ४ लाख रुपयांचा ठिबक सिंचन संचही आगीत जळून खाक झाला. महावितरणच्या हलगर्जीमुळे पोफळे यांचे ११ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. शेतकऱ्याच्या या नुकसानास वीज वितरण कंपनीचा हलगर्जीपणा जबाबदार आहे. यामुळे शेतकऱ्याला त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विजय पोफळे व परिसरातील शेतकºयांनी केली आहे.


Web Title: Sugarcane fire due to shot circuit in Wardha district, loss of 11 lakh
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.