राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धा: एैसी धाकड है, धाकड है...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 01:56 PM2019-01-31T13:56:09+5:302019-01-31T13:56:47+5:30

महाराष्ट्र कुस्तीगीर परीषद व सार्वजनिक बजरंग व्यायाम शाळा, देवळी यांच्यावतीने आयोजित २१ व्या महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या महिला पहेलवांनी मैदान गाजविले.

State-level Women's Wrestling Competition: It is a Tharakad, Thaqad Hai ... | राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धा: एैसी धाकड है, धाकड है...

राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धा: एैसी धाकड है, धाकड है...

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबईचे पहेलवान ‘भारी’ तर पुण्याचे ‘लय भारी’

हरिदास ढोक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र कुस्तीगीर परीषद व सार्वजनिक बजरंग व्यायाम शाळा, देवळी यांच्यावतीने आयोजित २१ व्या महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या महिला पहेलवांनी मैदान गाजविले. त्यात पुणे जिल्ह्याचाच बोलबाला राहिला असून इतर जिल्ह्याच्या पहेलवानांना छोबीपछाड देत स्पर्धेवर मोहर उमटविली. त्या पाठोपाठ मुंबईतील पहेलवानांनी कडवी झुंज देत उपविजेतेपदाचा मान पटकाविला.
देवळी येथील नवनिर्मित खासदार रामदास तडस स्टेडीयमवर मागील चार दिवसांपासून महिला आणि पुरुषांच्या कुस्तीचा महासंग्राम रंगला आहे. सुरुवातीला दोन दिवस पुरुषांची कुस्ती स्पर्धा पार पडली. त्यानंतर मंगळवार व बुधवारी महिलांची २१ वी राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा चांगलीच रंगली. दोन दिवस चालेल्या या महिला कुस्त्यांच्या सामन्यामध्ये विविध वजन गटात स्पर्धा झाली. यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, सांगली, सातारा, लातूर, अहमदनगर, बीड, धुळे, अमरावती व नागपूर या जिल्ह्यातील पहेलवानांनी कुस्तीचा फड गाजवून पारितोषीक पटकाविले.
या स्पर्धेतील विजेत्यांना राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पारितोषीक वितरण करण्यात आले. यावेळी खासदार रामदास तडस, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

विदर्भातील मल्लांनी मारली बाजी
२१ व्या महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत विदर्भातील महिला पहेलवानांनीही सहभाग घेतला होता. विदर्भातील मल्लांनीही आपल्या खेळाची चुणूक दाखवून विदर्भाचा ठसा उमटविला. या स्पर्धेत नागपूरच्या प्रिया घरजाळे हिने ५५ किलो वजन गटात तर अमरावतीच्या श्वेता सवई हिने ५७ किलो, भारती आमघरे हिने ६५ किलो व खुशबू चौधरीने ६८ किलो वजन गटात आपले वर्चस्व कायम राखले आहे.

वजन गटानुसार विजेत्या महिला पहेलवान
५० वजन गट- काजल जाधव (सोलापूर), किर्ती गुडलेकर (धुळे), निकिता गायकवाड (ठाणे), प्रगती ठोंबरे (बीड)
५३ वजन गट- दिक्षा कराडे (कोल्हापूर), अक्षता वाळूज (पिंपरी चिंचवड), कोमल देसाई (ठाणे), सोनम सरकार (सोलापूर),
५५ वजन गट- प्रिया घरजाळे (नागपूर), रुपाली वरदे (औरंगाबाद), प्रतिक्षा मुडे (बीड), श्रद्धा भोर (पुणे),
५७ वजन गट- सोनाली तोडकर (बीड), प्रितम दाभाडे (पुणे), श्वेता सवई (अमरावती), लक्ष्मी पवार (लातूर)
५९ वजन गट- विश्रांती पाटील (कोल्हापूर), काजल ढाकने (अहमदनगर), प्रतिक्षा नायकवाडे (सोलापूर), दुपाली सोनी (पिंपरी चिंचवड)
६२ वजन गट- अंकिता गुंड (पुणे), भाग्यश्री भोईर (कल्याण), ऋृतिका मानकर (मुंबई), सरोज पवार (ठाणे)
६५ वजन गट- मनाली जाधव (ठाणे), भारती आमघरे (अमरावती), जस्तिन शेख (नाशिक), जैमिया बागवान (लातूर)
६८ वजन गट- हर्षदा जाधव (पुणे), खुशबू चौधरी (अमरावती), शिवाणी पाटील (मुंबई), तेजल सोनवने (पुणे)
७२ वजन गट- कोमल गोळे (पुणे), ऋतुजा सपकाळ (कोल्हापूर), प्रियंका दुबुले (सांगली), वैष्णवी पायगुंडे (सातारा)
७६ वजन गट- मनिषा दिवेकर, स्वाती पाटील (मुंबई), वर्षाराणी पाटील (मुंबई), भाग्यश्री गडकर (कल्याण)

Web Title: State-level Women's Wrestling Competition: It is a Tharakad, Thaqad Hai ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.