नोटाबंदीनंतर पुन्हा रोकड तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:04 AM2018-04-21T00:04:33+5:302018-04-21T00:04:33+5:30

नोटाबंदीच्या आदेशानंतर जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोकड तुटवड्याच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. त्या घटनेनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा रोकड तुटवडा सध्या निर्माण झाला आहे.

 Shortage of cash again after the annunment | नोटाबंदीनंतर पुन्हा रोकड तुटवडा

नोटाबंदीनंतर पुन्हा रोकड तुटवडा

Next
ठळक मुद्देकॅशलेस एटीएमने वाढविली डोकेदुखी : बहुतांश एटीएमवर ‘नो-कॅश’चे फलक

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नोटाबंदीच्या आदेशानंतर जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोकड तुटवड्याच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. त्या घटनेनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा रोकड तुटवडा सध्या निर्माण झाला आहे. त्यातच जिल्ह्यातील एकूण १७६ एटीएम पैकी सुमारे ८० टक्के एटीएम समोर नो-कॅशचे फलक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात विविध राष्ट्रीयकृत व खासगी बँकांचे असे एकूण १७६ एटीएम कक्ष आहेत. त्यापैकी बहूतांश एटीएम कक्षात रोकड टाकण्याची जबाबदारी बँकांनी खासगी कंपन्यांना दिली आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावे यासाठी प्रत्येक दिवशी सुमारे सहा कोटी रोकडची गरज असते. परंतु, सध्यास्थितीत प्रत्येक पंधरा दिवसांच्या कालावधीत केवळ १ कोटींची रोकडच जिल्ह्याला प्राप्त होत असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील नागरिकांकडून विविध आर्थिक व्यवहार करण्यासाठी होत असलेली रोकडची मागणी व त्याच्या तुलनेत रिझर्व बँकेकडून नाममात्र होणारा रोकड पुरवठा यामुळे अनेक एटीएम सध्या कॅशलेस असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी शहराचा फेरफटका मारला असता बहूतांश एटीएम समोर नो-कॅशचा फलक कायम असल्याचे दिसून आले. रोकड काढणाऱ्यांना कॅश असलेल्या एटीएमचा शोध घेण्यासाठी भटकंतीच करावी लागत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ज्या एटीएम मध्ये रोकड आहे तेथे रोकड काढणाºयांनी एकच गर्दी केल्याचे दिसून येत आहे. एकूणच कॅशलेस एटीएमने सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखीच वाढविल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
२००० च्या नोटांचा तुटवडा
केंद्र सरकारकडून नव्याने संसदेत आणण्यात येणारे विधेयक व नुकत्याच उघडकीस आलेल्या पीएनबी बँक घोटाळ्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच जिल्ह्यातील अनेक एटीएममधून पूर्वी प्रमाणे दोन हजाराचे चलन निघत नसल्याचे दिसते. काहींनी दोन हजारांचे चलन आपल्याकडे साठवून ठेवल्याने दोन हजारांच्या नोटांचा तुटवडा जिल्ह्यात जाणवत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
आॅनलाईन व डिजिटलकडे पाठ
डिजिटल इंडिया या उपक्रमाच्या माध्यमातून सर्व आर्थिक व्यवहार प्रत्येकाने आॅनलाईन पद्धतीने करण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. परंतु, जिल्ह्यात सध्यास्थितीत नागरिकांकडून आॅन लाईन पद्धतीने व डिजिटल पद्धतीने व्यवहार करण्याकडे पाठ दाखविल्या जात आहे. त्यामुळे रोकडच्या मागणीत वाढ होऊन रोकड तुटवडा निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. ही परिस्थिती अशीच आणखी पंधरा दिवस कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे.
गरज सहा कोटींची; पण प्राप्त होतात केवळ एक कोटी
नागरिकांनी डिजिटल पद्धतीचा अवलंब करीत आपले आर्थिक व्यवहार केल्यास प्रत्येक दिवशी १ कोटी रोकड असल्यास रोकड तुटवडा जाणवणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पूर्वी दररोज ६ कोेटी रोकड जिल्ह्याला प्राप्त होत होती. परंतु, आता चौदा दिवसांच्या कालावधी लोटल्यानंतर केवळ १ कोटी इतकीतच रक्कम प्राप्त होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
 

Web Title:  Shortage of cash again after the annunment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.