धारदार शस्त्राने भोसकून युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 11:45 PM2018-06-06T23:45:41+5:302018-06-06T23:45:52+5:30

धारदार शस्त्राने वार करून युवकाचा खून केल्याची घटना समुद्रपूर शहरात घडली. हत्या करून मृतदेह येथील लोहकरे ले-आऊटमध्ये टाकण्यात आला होता. या मृतदेहाचे डुकरांनी लचके तोडल्याचे दिसून आले. ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. हरिष उर्फ हऱ्या लक्ष्मण कोराम (३५) असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Sharpened youth killed by sharp weapons | धारदार शस्त्राने भोसकून युवकाचा खून

धारदार शस्त्राने भोसकून युवकाचा खून

Next
ठळक मुद्देमृतदेहाचे डुकरांनी तोडले लचके

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : धारदार शस्त्राने वार करून युवकाचा खून केल्याची घटना समुद्रपूर शहरात घडली. हत्या करून मृतदेह येथील लोहकरे ले-आऊटमध्ये टाकण्यात आला होता. या मृतदेहाचे डुकरांनी लचके तोडल्याचे दिसून आले. ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. हरिष उर्फ हऱ्या लक्ष्मण कोराम (३५) असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हत्येची माहिती होताच मृतकाच्या भावाने पोलिसात तक्रार केली. या तक्रारीत संशय दाखविलेल्यांना पोलिसांनी ताब्यात घेत विचारणा केली असता त्यांच्याकडून कुठलाही सुगावा मिळाला नाही. तर संशयीतांपैकी एक जण फरार असून त्यानेच ही हत्या केली असावी असा संशय पोलिसांचा आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याचा दारू विक्रीचा व्यवसाय होता. सोबत त्याला गांज्याचे सुद्धा व्यसन जडले होते. मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास हरिष गांजा ओढण्याकरिता लोहकरे ले-आऊट परिसरामध्ये आला होता. त्यानंतर तो घरी परतला नव्हता. पहाटे ५.३० वाजताच्या दरम्यान ले-आऊट मधील खुल्या जागेत एका इसमाला मृतदेह पडून दिसला. त्यांनी पोलिसांना माहिती देताच त्वरीत पोलीस घटनास्थळी पोहोचले.
ठाणेदार प्रवीण मुंडे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लिंगाडे, उमेश हरणखेडे यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल झाले. मृतदेहाची पाहणी केली असता चेहरा चेंदामेंदा झाल्याने पूर्णत: विद्रूप झाला होता. हनवटीवर मोठ्या हत्याराचे वार होते तर डोक्यावरचे केस पूर्ण निघाले होते. मृतदेहाची ओळख त्याच्या भावाने कपड्यावरून केली. परिस्थिती पाहता ठाणेदार मुंडे यांनी घटनास्थळी ठसे तज्ज्ञ, श्वान पथकाला पाचारण केले. फॉरेन्सीक लॅब पथकही घटनास्थळी दाखल झाले होते. विभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांनीही घटनास्थळाला भेट दिली.
या प्रकरणाचा तपास ठाणेदार प्रवीण मुंडे, प्रवीण लिंगाडे, उमेश हरणखेडे, माधुरी गायकवाड, अशोक चंहादे, नरेंद्र मते, अभय घुसे, स्वप्नील वाटकर, कोटेश्वर हायगुणे, राजेंद्र जयसिंगपूरे, निकम, मारोती जांभळे करीत आहेत.
आरोपीच्या अटकेनंतरच शवविच्छेदन
मृतकाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन त्याच्या सोबत दिवसभर असणाºया काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र मुख्य संशय असलेला आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले. हरिष ज्यांच्याकडे गांजा ओढण्याकरिता यायचा तोच मुख्य आरोपी असल्याचा संशय आहे. जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन करणार नाही, अशी भूमिका मृतकाचा भाऊ लाला उर्फ अंकुश कोराम याने घेतली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Web Title: Sharpened youth killed by sharp weapons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून