Sexual harassment of a girl by her father at Pulgaon in Wardha district | वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे पित्याकडून मुलीचे लैंगिक शोषण

ठळक मुद्देचार महिन्यांपासून सुरू होता अत्याचार

आॅनलाईन लोकमत
पुलगाव : जन्मदाता पिताच चार महिन्यांपासून मुलीचे लैंगिक शोषण करीत असल्याची घटना दहेगाव (धांदे) येथे उघडकीस आले. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून दारूविके्रत्या पित्यावर गुन्हा नोंदवित त्याला अटक करण्यात आली.
दहेगाव (धांदे) येथील नराधम पित्याने १३ वर्षीय मुलीवर मागील चार महिन्यापासून लैंगिक अत्याचार केले. याबाबत मुलीने बुधवारी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३७६ (२)(१), ३७६ (२) एन, ३७६ (२) एफ, ३७७, ५०६, बालकाचे अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम ६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली असून पूढील तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वप्ना निरांजने करीत आहेत. या संतापजनक घटनेमुळे गावात तथा परिसरात खळबळ माजली आहे.