वीजतारेच्या स्पर्शाने सात म्हशी ठार; एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 09:49 PM2019-04-17T21:49:07+5:302019-04-17T21:50:13+5:30

शेतात चरायला गेलेल्या म्हशींना तुटलेल्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्यामुळे ७ म्हशी जागीच ठार झाल्या तर एक गंभीर आहे. ही घटना बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास वाडी शिवारात घडली. यात शेतकऱ्यांचे ८ लाखांचे नुकसान झाले असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

Seven buffers killed by electricity; One injured | वीजतारेच्या स्पर्शाने सात म्हशी ठार; एक जखमी

वीजतारेच्या स्पर्शाने सात म्हशी ठार; एक जखमी

Next
ठळक मुद्देवादळवाऱ्यामुळे तुटल्या तारा : शेतकऱ्यांचे आठ लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : शेतात चरायला गेलेल्या म्हशींना तुटलेल्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्यामुळे ७ म्हशी जागीच ठार झाल्या तर एक गंभीर आहे. ही घटना बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास वाडी शिवारात घडली. यात शेतकऱ्यांचे ८ लाखांचे नुकसान झाले असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस व महावितरणच्या अभियंत्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
आष्टी तालुक्यात मंगळवारच्या रात्री वादळी पावसाने चांगलेच थैमान घातले होते. या वादळात विद्युत तारा तुटून जमिनीवर पडल्या व तशाच प्रवाहित राहिल्या. बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास बांबर्डा येथील शेतकरी अंबादास चंदिवाले यांच्या तीन म्हशी, पिराजी चंदिवाले यांच्या दोन, शिवाजी चंदिवाले यांच्या दोन व नामदेव चंदिवाले यांची १ अशा आठ म्हशी वाडी शिवारातील मनाबाई चामलाटे यांच्या शेताजवळील पडिक भागात चरण्यासाठी गेल्या होत्या. चरत असताना वादळामुळे तुटून पडलेल्या जीवंत विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने एका पोठोपाठ सात म्हशी ठार झाल्या तर एक म्हैस दुर असल्याने ती विद्यूत स्पर्श होताच फेकल्या गेली. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेची माहिती शेतकऱ्यांनी माजी सरपंच नामदेव नायकुजी यांना दिली. त्यांनी पोलीस पाटील मोहित बगलेकर यांना कळविले. लागलीच पोलीस स्टेशन व महावितरणला माहिती दिल्यानंतर पोलीस आणि महावितरणचे अभियंता अतकरी व लाईनमन सावरकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यात शेतकऱ्यांचे आठ लाख रुपयाचे नुकसान झाले असून महावितरणने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
महावितरणचा प्रताप चव्हाट्यावर
ग्राहकांकडून महावितरण मोठ्या प्रमाणात देयक वसुल करीत असतानाही सेवा देण्यात कुचराई करत असल्याचे असंख्य प्रकारावरुन सिद्ध झाले आहे. आताही विद्युत तारा तुटल्याने म्हशींना जीवंत ताराचा स्पर्श होताच त्या मृत्यूमुखी पडला. स्पर्श होताच वीजपुरवठा फ्युज जाऊन बंद का झाली नाही. याची पाहणी करण्याकरिता नागरिक व शेतकरी डीपीकडे गेले असता फ्युज ताराऐवजी जाड तार वारल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ग्रीप काढेपर्यंत विद्युत प्रवाह कायम होता. महावितरणच्या याच भोंगळ कारभारामुळे विद्युत प्रवाहाच्या स्पर्शाने मृत्यूच्या घटना वाढत असल्याचा आरोप गावकºयांनी केला असून याप्रकरणी महावितरण विरुद्ध पोलिसात तक्रार नोंदविली आहे.

Web Title: Seven buffers killed by electricity; One injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.