ग्रामीण भागाच्या विकासात अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 01:49 AM2019-06-10T01:49:22+5:302019-06-10T01:49:49+5:30

ग्रामीण भागाच्या विकासासाठी अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्या मागण्या आणि समस्या सोडविण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. अभियंत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन खासदार रामदास तडस यांनी दिले.

The role of engineers in rural development is important | ग्रामीण भागाच्या विकासात अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची

ग्रामीण भागाच्या विकासात अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची

Next
ठळक मुद्देरामदास तडस : समस्या निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : ग्रामीण भागाच्या विकासासाठी अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्या मागण्या आणि समस्या सोडविण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. अभियंत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन खासदार रामदास तडस यांनी दिले.
येथील बा. दे. अभियांत्रिकी महाविद्यालयात जि.प. अभियंता संघटनेची राज्यस्तरीय विशेष बैठक रविवारी पार पडली. या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर आ. समीर कुणावार, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू शिंदे, महासचिव सुहास धारासुरकर, कार्याध्यक्ष सतीश मार्बते, बा.दे. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उगेमुगे, रावसाहेब पाटील आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
खा. तडस पुढे म्हणाले, पाच वर्षांत सरकारने विकास साधला आहे. ग्रामीण भाग शहराशी जोडल्या गेला पाहिजे. शासनाचा सर्व निधी ग्रामीण भागात पोहचविणे आणि चांगल्या प्रकारे काम करण्याची जबाबदारी अभियंत्यांची असते. शिवाय, ते चांगल्या प्रकारे कार्य करतात. मागील सरकारपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार गतीने काम करीत आहे. वर्धा ही महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असल्याने या जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा आहे. तुमच्या मागण्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
पंचायत राजमध्ये अभियंत्यांना विविध प्रकारची आणि योजनेची कामे करावी लागतात. ग्रामीण भागात काम करीत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपणही प्रयत्न करू, असे जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यावेळी म्हणाले. कार्यक्रमादरम्यान हिंगोली येथील प्रज्ञा कुळकर्णी लिखित ‘शब्द राणी’या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक संजय उगेमुगे तर संचालन अविनाश गोहाड यांनी केले. बैठकीला २८ जिल्ह्यातील १५० पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मुंबई दरबारी प्रश्न मांडणार -समीर कुणावार
संघटनेच्या माध्यमातून प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केल्या जातात. अभियंता हा विकासातील महत्त्वाचा घटक आहे. आम्ही निधी आणतो. शासन उपलब्ध करून देते; पण प्रत्यक्षात कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम अभियंता करीत असतात. म्हणून लोकविकाच्या कामात आणि सेवा देण्यात अभियंता महत्त्वाचा आहे. त्यांच्या समस्या निकाली निघाव्या म्हणून आपण हा विषय येत्या अधिवेशनादरम्यान विधिमंडळात मांडू, असे आश्वासन आ. समीर कुणावार यांनी याप्रसंगी दिले.

Web Title: The role of engineers in rural development is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.