गावकऱ्यांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:52 PM2019-03-14T23:52:51+5:302019-03-14T23:53:12+5:30

तालुक्यातील भिडी येथे मालवाहूच्या धडकेत दुचाकीस्वार माजी सरपंच गंभीर जखमी झाले. दिलीप बिल्डकॉनच्या चुकीमुळे महिन्याभरात दोन अपघात झाल्याने संतप्त नागरिकांनी गुरुवारी दुपार ११ वाजता रास्तारोको केला.तब्बल दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे वर्धा- यवतमाळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

Road to the villagers | गावकऱ्यांचा रास्तारोको

गावकऱ्यांचा रास्तारोको

Next
ठळक मुद्देदोन तास वाहतूक ठप्प : दिलीप बिल्डकॉन कंपनीविरूद्ध गावकऱ्यांचा आक्रोश

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : तालुक्यातील भिडी येथे मालवाहूच्या धडकेत दुचाकीस्वार माजी सरपंच गंभीर जखमी झाले. दिलीप बिल्डकॉनच्या चुकीमुळे महिन्याभरात दोन अपघात झाल्याने संतप्त नागरिकांनी गुरुवारी दुपार ११ वाजता रास्तारोको केला.तब्बल दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे वर्धा- यवतमाळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
प्रदीप डहाके, असे जखमी झालेल्या माजी सरपंचाचे नाव आहे. ते दुचाकीने जात असताना एम.एच. ३२ झेड ०३४६ क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने त्यांना जबर धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तत्काळ सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले. वर्धा-यवतमाळ मार्गावर दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या नियोजनशुन्यतेमुळेच अपघात होत असल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी रास्तारोको केला. अखेर पोलिसांच्या मध्यस्तीनंतर गावकरी आणि बिल्डकॉनचे अधिकारी यांच्यात चर्चा झाली. यावेळी रस्ता ओलांडण्याकरिता ओव्हरब्रीज तयार करावा, गावात जाण्याकरिता सर्व्हीस रोड तातडीने तयार करावा तसेच बसस्थानक दुसरीकडे हलविण्यात यावे आदी मागण्या लावून धरल्या. या आंदोलनातील मयूर डफरे, सुनील चोरे, डॉ. प्रकाश काळे, वासुदेव दिघाडे, सचिन गवळी, सुशील राऊत व पदाधिकाºयांनी प्रश्नांचा भडीमार केला. मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

चौपदरीकरणाचा फटका
नागपूर-तुळजापूर महामार्गाचे सिमेंंटिकरण व चौपदरीकरीणाचे काम सुरू आहे.हे काम दिलीप बिल्डकॉन कंपनीमार्फत होत असल्याने ठिकठिकाणी नियोजनशून्यतेमुळे वाहनचालकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. देवळी-यवतमाळ मार्गावरील भिडी या गावातही या महामार्गाचे काम सुरु आहे. येथील बांधकामातही कंत्राटदार असलेल्या बिल्डकॉन कंपनीने मनमर्जी काम चालविले आहे. याचा त्रास गावकºयांसह विद्यार्थी व शेतकºयांना सहन करावा लागत असल्याने रोष वाढत आहे.

Web Title: Road to the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप