ठळक मुद्देपत्रकार परिषदेत राम शिंदे यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जलयुक्त शिवार अभियानात योग्यरित्या काम न करणाºया कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार नोडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. यात कंत्राटदारांना ब्लॅकलिस्टेड करता येते. काम वेळेत पूर्ण न करणाºया कंत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी वर्धा येथे पत्रपरिषदेत सांगितले.
यापुढे जास्तीत जास्त कामे घेऊन जाणीवपूर्वक काम करण्यास विलंब करणाºया आणि पावसाळ्यापूर्वी कार्यादेश दिला असतानाही काम वेळेत पूर्ण न केल्यामुळे पाणीसाठा न होण्यास कारणीभूत असलेल्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येईल, असे ना. शिंदे पुढे म्हणाले.
यावेळी खा. रामदास तडस, आ. समीर कुणावार, आ. आशिष देशमुख, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, रोहयो व जलसंधारण सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, सीईओ नयना गुंडे उपस्थित होते.