केवळ ८२२ शेतकऱ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:10 AM2018-01-24T00:10:59+5:302018-01-24T00:11:26+5:30

गत खरीपात तुरीने शेतकऱ्यांना जेरीस आणले होते. यात शासनाने शासकीय खरेदी सुरू केली; मात्र अनियोजनामुळे शेतकऱ्यांची पंचाईत झाली. यंदाच्या हंगामात तसे होवू नये म्हणून गत हंगामात घेतलेला निर्णय शासनाने कायम ठेवत शेतकऱ्यांना पहिलेच आॅनलाईन नोंदी करण्याच्या सूचना केल्या.

Registration of only 822 farmers | केवळ ८२२ शेतकऱ्यांची नोंदणी

केवळ ८२२ शेतकऱ्यांची नोंदणी

Next
ठळक मुद्दे नाफेडचा मुहूर्त नाही : शासकीय तूर खरेदीकडे शेतकरी पाठ फिरविण्याचे संकेत

रूपेश खैरी।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गत खरीपात तुरीने शेतकऱ्यांना जेरीस आणले होते. यात शासनाने शासकीय खरेदी सुरू केली; मात्र अनियोजनामुळे शेतकऱ्यांची पंचाईत झाली. यंदाच्या हंगामात तसे होवू नये म्हणून गत हंगामात घेतलेला निर्णय शासनाने कायम ठेवत शेतकऱ्यांना पहिलेच आॅनलाईन नोंदी करण्याच्या सूचना केल्या. शासकीय दराकरिता शेतकऱ्यांना ही नोंद आवश्यक असताना त्यांच्याकडून याकडे पाठ केली जात असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. यात आतापर्यंत केवळ ८२२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असल्याचे समोर आले आहे.
शेतकऱ्यांकडून तुरीची कापणी करून ती काढत बाजारात आणणे सुरू झाले आहे. वर्धा बाजारात आतापर्यंत ४०० क्ंिवटल नवीन तूर आल्याचे सांगण्यात आले. या तुरीला ४ हजार ६०० रुपयांचा दर मिळत असून शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळावा अशी आशा आहे. या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा नाफेडच्या खरेदीकडे लागल्या असताना त्यांच्याकडून अद्याप खरेदी संदर्भात निर्णय घेण्यात आलेना नाही. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे समोर येत असून नाफेडचे केंद्र सुरू करावे अशी मागणी आहे.
यंदाच्या हंगामात कापूस उत्पादकांना बोंडअळीने आर्थिक अडचणीत आणल्याने त्यांना तुरीपासून काही लाभ होईल असे वाटत होते. या आशेत असतानाच ऐन हिवाळ्यात तुरीचे पीक वाळल्याने यंदा तुरीचे उत्पन्न होईल अशी चिन्हे नाहीत. यातही मिळणाऱ्या दरामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाचा दर ५ हजार ४०० रुपये असताना बाजारात ४ हजार ६०० रुपये व्यापारी देत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. शासनाची खरेदी सुरू नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना तूर देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शासनाने वेळीच तुरीची खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.
हिंगणघाट व आष्टीत नाफेड खरेदी नाही
जिल्ह्यातच नाही तर विदर्भात लौकीक असलेल्या हिंगणघाट बाजार समितीत नाफेडने खरेदी केंद्र नाकारले आहे. या सोबतच आष्टी बाजारातही नाफेडचे केंद्र नसल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही.पी. आपदेव यांनी दिली. हिंगणघाट बाजारात भावाच्या आशेने शेतकऱ्यांची आवक मोठी आहे. या समितीत जर शासकीय खरेदी केंद्र नसले तर या भागातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरात नाफेडने खरेदी सुरू होण्यापुर्वीच या भागात केंद्राची मागणी शेतकरी करीत आहेत.
तूर खरेदीबाबत नाफेडचा अद्याप निर्णय नाही
नवीन तूर बाजारात येत आहे. शिवाय व्यापाऱ्यांकडून मिळत असलेला दरही अत्यल्प आहे. यामुळे शासनाच्यावतीने नाफेडची खरेदी सुरू करणे आता अपेक्षित आहे. शासकीय खरेदी सुरू होताच शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्याची अपेक्षा राहील व यातूनच व्यापारी त्यांचे भाव वाढवतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
नोंदणीकरिता बाजार समितीत केंद्र
शासनाने गत हंगामापासून खरेदी आॅनलाईन केल्याने शेतकऱ्यांना नोंदी करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. नाफेडच्या खरेदी केंद्रावर तसेच प्रयेक बाजार आणि उपबाजार समितीत पणन महामंडळाच्यावतीने केंद्र सुरू करून शेतकऱ्यांनी नोंदणी सुरू केली आहे. असे असले तरी तुलनेत शेतकºयांनी नोंदी करण्याकडे पाठ केल्याचे दिसत आहे.

Web Title: Registration of only 822 farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.