आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांचे प्रश्न रेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 10:11 PM2018-11-15T22:11:01+5:302018-11-15T22:11:26+5:30

विदर्भासह मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील शेतकरी महिलांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महिला किसान अधिकार मंचच्यावतीने २१ नोव्हेंबरला मुंबईच्या आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येणार आहे.

The question of women in the family of suicide victims will be questioned | आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांचे प्रश्न रेटणार

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांचे प्रश्न रेटणार

googlenewsNext
ठळक मुद्देनूतन माळवी : पत्रपरिषदेत दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विदर्भासह मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील शेतकरी महिलांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महिला किसान अधिकार मंचच्यावतीने २१ नोव्हेंबरला मुंबईच्या आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजित पत्रपरिषदेत प्रा. नूतन माळवी यांनी दिली.
प्रा. नूतन माळची पुढे म्हणाल्या, महिला किसान अधिकार मंच ही संघटना समाजातील दुर्बल व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते. अनेक आंदोलने सदर संघटनेच्यावतीने करण्यात आली आहेत. सन १९९५ ते २०१५ या कालावधीत राज्यात सुमारे ६५ हजारांच्यावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या करणाºयांमध्ये ९० टक्के पुरुष शेतकरी आहेत. घरातील कर्ताच राहिला नसल्याने अशा कुटुंबियांवर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे. शिवाय त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा कुटुंबियांना सरकारने सामाजिक बांधिलकी जोपासत आधार देणे गरजेचे आहे. पात्र-अपात्र आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना तातडीने शासकीय मदत देणे.
आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या विधवेला पेंशन सुरू करणे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींना मोफत शिक्षण देणे. त्यांना अल्प मोबदल्यात शासकीय धान्य देण्यात यावे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्यांना नि:शुल्क आरोग्य सेवा देणे आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून सरकार दरबारी रेटण्यात येणार असल्याचे सांगितले.
 

Web Title: The question of women in the family of suicide victims will be questioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.