The plunder of the masses under the 'Beti Bachao Beti Padhao' scheme | ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेतून जनतेची लूट

ठळक मुद्देनगरसेवकांचा प्रताप : प्रत्येकी १५० रुपये वसुली

आॅनलाईन लोकमत
आर्वी : ‘प्रधानमंत्री बेटी बचाओ बेटी पढाओ’ ही योजना खºया अर्थाने अंमलात आलेली नसल्याचे समजते. असे असले तरी काही नगरसेवक या योजनेच्या नावावर नागरिकांकडून प्रत्येकी १५० रुपये वसूल करीत असल्याची ओरड होत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
दोन-तीन नगरसेवक या योजनेचा खोटा प्रचार, प्रसार करून वॉर्डातील लोकांना प्रधानमंत्री बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेचा अर्ज भरून देतात. त्यांच्याकडून त्या मोबदल्यात १५० रुपये घेत आहेत. प्रधानमंत्री बेटी बचाओ बेटी पढाओ योजना केंद्र शासनाकडून सुरू असल्याचा काही नगरसेवक देखावा करीत आहेत. यामुळे येथील पोस्ट आॅफीसमध्ये अर्ज भरणाºयांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. शहरात अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. यात सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचे दिसून येत आहे.
अद्याप जिल्ह्यात तथा आर्वी तालुक्यात या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला नाही. असे असले तरी काही नगर सेवक चुकीचा प्रसार व प्रचार करीत आहे. यातून जनतेची लूट होत आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी या प्रकराकडे लक्ष देत चुकीचा प्रचार करीत जनतेची लूट करणाºयांवर कार्यवाही करावी तथा योजनेबाबत जनजागृती करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

वर्धा जिल्ह्यात वा आर्वी शहरात ही योजना अद्याप सुरू झालेली नाही. काही लोक ही योजना सुरू असल्याचे जे सांगतात, ते पूर्णपणे खोटे आहे.
- शिवा गजभिये, बालविकास प्रकल्प अधिकारी, आर्वी.