१५ दिवसापूर्वी बांधलेल्या रस्त्यावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 10:09 PM2018-07-14T22:09:31+5:302018-07-14T22:09:47+5:30

मुख्यमंत्री सडक योजना (१६-१७)अंतर्गत महामार्ग क्र. ६ ते दाभापर्यंत बांधण्यात आलेल्या १.६ कि़मी.चा डांबरी रस्ता, केवळ १५ दिवसात पहिल्या पावसाने खराब झाला आहे. या दुरावस्थेमुळे रस्त्याच्या बांधकामाच्या गुणवत्तेबद्दल सर्वत्र शंका व्यक्त केली जात आहे.

Pavement on the road built 15 days ago | १५ दिवसापूर्वी बांधलेल्या रस्त्यावर खड्डे

१५ दिवसापूर्वी बांधलेल्या रस्त्यावर खड्डे

Next
ठळक मुद्देरस्त्याचे काम अपूर्णच : कडा पक्क्या मुरुमाने भरल्या नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : मुख्यमंत्री सडक योजना (१६-१७)अंतर्गत महामार्ग क्र. ६ ते दाभापर्यंत बांधण्यात आलेल्या १.६ कि़मी.चा डांबरी रस्ता, केवळ १५ दिवसात पहिल्या पावसाने खराब झाला आहे. या दुरावस्थेमुळे रस्त्याच्या बांधकामाच्या गुणवत्तेबद्दल सर्वत्र शंका व्यक्त केली जात आहे. बांधकामाच्या गुणवत्तेबद्दल सखोल चौकशी करुनच संबंधित ठेकेदाराला बांधकामाची रक्कम अदा करावी, अशी मागणी जनेतेने केली आहे.
मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत ७२.४ लक्ष प्राकलन किंमत असलेला महामार्ग क्र. ६ ते दाभापर्यंत बांधण्यात आलेल्या १.६ कि़मी. रस्ता, डांबरीकरण व मजबुती करण्यासाठी मंजुर झाला. महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था वर्धा येथील अभियंताच्या देखरेखीखाली शासकीय कंत्राटदाराचे मार्फत या रस्त्याचे बांधकाम १८ मे २०१७ ला सुरू करुन १७ मे २०१८ ला पूर्ण करायचे होते.
भूमीपूजनानंतर दोन महिन्यांनी कामाला पावसाचे तोंडावर सुरुवात झाली. १.६ कि़मी. रस्त्याचे डांबरीकरण, एक मोठा पुल व दोन रपटे या बांधायचे होते. संबंधित कंत्राटदाराने पावसाच्या भीतीने अत्यंत लगबगीने कसेबसे रस्त्याचे काम सुरू केले. आणि अवघ्या एका महिन्यात संपविले. त्यामुळे कामाचा दर्जा निकृष्ठ राहीला. काम पूर्ण झाल्यावर पंधरा दिवसातच पहिल्या पावसाने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी डांबर कमी वापरल्यामुळे गिट्टी उघडी पडली आहे. नदीवरील मुख्य पुलाचे बांधकाम अद्यापही अपूर्णच आहे, दोन रपट्याचे काम पूर्ण झाले नाही.
पुलाचे बाजुला काढलेला वाहतूक रस्ता पावसाने वाहुन गेला. दाभा गावाजवळील मुख्य पुल बांधकाम अपूर्ण राहिल्याने नदीचे पाणी शेजारच्या शेतात घुसून शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान झाले आहे. रस्त्याच्या कडेला पक्का मुरुम न भरल्यामुळे रस्त्याखाली वाहने उतरणे धोकादायक व अपघाताला निमंत्रण देणारे झाले आहे. अनेक ठिकाणी हा नवीन केलेला रस्ता दबला गेला आहे. रस्त्याचा उतार व्यवस्थित काढल्या गेल्या नसल्यामुळे रस्त्यावर पाणी साचून डांबरीरस्ता खराब होतो आहे. बांधकामाची मुदत संपली तरी मुख्य पुल व दोन रपट्याचे काम अपूर्णच आहे. ते केव्हा होणार, दर्जेदार होणार किंवा नाही हा ही प्रश्न आहे.
रस्त्याची दुरावस्था पाहुन या रस्त्याच्या बांधकामाची पाहणी संबंधित अधिकाºयांनी केली की नाही याबाबत शंका निर्माण होत आहे. बांधकाम तपासणी केल्या शिवाय ठेकेदाराला रक्कम अदा करु नये अशी नागरिकांची मागणी आहे.याबाबत निवेदनही देण्यात आले आहे.
अधिकारी व कंत्राटदाराचे साटेलोटे
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असो वा पंतप्रधान ग्राम सडक योजना असो यात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत आहे. कॉग्रेस सरकारच्या काळात या योजनेमध्ये गैरप्रकार जिल्ह्यात झाले आताही हाच प्रकार सुरू आहे. अधिकारी व कंत्राटदार यांच्या आर्थिक संबधामुळे निकृष्ट दर्जाचे काम करण्याची हिंमत कंत्राटदाराची होते अशा आरोप होत आहे.
पुलाला भेगा पडल्याने अपघातास निमंत्रण
बोरधरण - बोरी गावाला लागूनच असलेल्या पुलाला मोठया भेगा पडल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे प्रवाश्याना पुलाच्या दुसऱ्या बाजुने येजा करावी लागते बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.सेलु तालुक्यातील बोरधरण हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद आहे .व्याघ्र प्रकल्प असल्याने पर्यटक दुरवरुन येतात पर्यटकांना बोरी या गावावरून बोरधरणला जावे लागते बोरी गावालाच लागुनच रस्त्यावर पुल आहे त्या पुलाला मोठी भेग पडली व आतील भाग पोकळ असल्याचे दिसुन येते येणाऱ्या पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.बोरधरण येथे हवसे नवसे पर्यटक सुटीचा आनंद लुटण्याकरिता येतात बाहेर जिल्ह्यातून सुध्दा पर्यटक बोरधरण बघण्यासाठी येत असते. बोरी येथील पुलाला भेग पडून पुलाच्या भिंतीला सुध्दा भेगा पडल्याचे दिसून येते अशातच या जागेवरून मोठे वाहन बस,टॅव्हलस, चार चाकी वाहन जात असताना तो पुल दबल्यास त्या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकते त्या पुलावरून वाहन चालक आपले वाहन दुसºया भागातून काढत असते तर दुसºया वाहनांना पलीकडे थांबावे लागते पुलाला कठडेही नसल्याने वाहन पुलाच्या काठावरून व ज्या ठिकाणी भेग पोकळ जागा आहे त्या ठिकाणावरून नागरिकांना व पर्यटकांना आपली वाहने न्यावी लागते वरिष्ठांनी पुलाची पाहणी करून पुल दुरस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याच भागात दोन पूल केवळ पायल्या टाकून करण्यात आले आहे.

Web Title: Pavement on the road built 15 days ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार