P. Chidambaram understood the problems of Madani people; Meeting with the Dattak village, meeting in the Collector's office | पी. चिदंबरम यांनी जाणल्या मदनीवासीयांच्या समस्या; दत्तक गावाला दिली भेट, जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

वर्धा : माजी केंद्रीय मंत्री खा. पी. चिदंबरम यांनी वर्धा जिल्ह्यातील मदनी हे गाव विकासासाठी दत्तक घेतले आहे. शनिवारी त्यांनी गावाला भेट देऊन गावक-यांशी संवाद साधला.
मदनी ग्रामपंचायतीच्या प्रांगणात गावातील नागरिकांच्या उपस्थितीत गावामध्ये राष्ट्रीयीकृत बँक शाखा, क्रीडांगण, वाचनालय, सांस्कृतिक भवन, गावातील पाणीपुरवठा योजना, व्यायामशाळा या सगळ्या कामाकरिता लागणाºया जागेची स्वत: पाहणी केली. सोबत अनेक विकासकामांचे प्रस्ताव गावकºयांकडून स्वीकारले. गावकºयांशी संवाद साधल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाºयांची बैठक घेतली. विकासकामांचे अंदाजपत्रक तयार करून कामाला गती देण्याची सूचना केली.
चिदंबरम यांनी वर्ध्यातील महात्मा गांधी आश्रमाला भेट देऊन बापू कुटीमधील सर्वधर्म प्रार्थनेत सहभाग घेतला. आश्रमात अधीक्षक भावेश चव्हाण व व्यवस्थापक नामदेव ढोले यांनी त्यांचे सूतमाळ व सेवाग्राम आश्रम पुस्तक देऊन स्वागत केले. आश्रम व स्मारकांची माहिती घेत सर्वधर्म प्रार्थना झाली. आश्रमासमोर ११ आॅक्टोबरपासून सेवानिवृत्त कर्मचाºयांचा सत्याग्रह सुरू आहे. या कर्मचाºयांनी चिदंबरम यांना निवेदन देत माहिती दिली.

सेवाग्राम आश्रमातील अभिप्राय
सेवाग्राम भेटच्या संधीला माझे भाग्य समजतो. जिथे महात्मा गांधींनी १० वर्षे राहून भारतासाठी कार्य केले. मी भावमुग्ध झालो. ज्या पद्धतीने गांधीजींनी ८० वर्षांपूर्वी वास्तू उभारल्या त्या आजही जशाच्या तशाच आहेत. गांधीजींप्रति पवित्र आदरयुक्त भावना मी व्यक्त करतो, असे चिदंबरम यांनी आश्रमातील पुस्तिकेत लिहिले.