मैदानी खेळांना ‘खेलो इंडिया’ मुळे मिळाला उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 09:52 PM2019-02-18T21:52:31+5:302019-02-18T21:52:47+5:30

परंपरागत खेळाचा राजाश्रय संपल्याने मधल्या काळात बऱ्याचशा खेळांना अवकळा आली होती. परंतु आजच्या स्थितीत ‘खेलो इंडिया’ व ‘सीएम’ चषकाच्या आयोजनातून कबड्डी व कुस्तीच्या खेळाला उजाळा मिळाला आहे. तसेच हे मैदानी खेळ जीवंत ठेवण्यासाठी प्रयत्न होत आहे, असे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.

Outdoor sports were found by 'Play India' | मैदानी खेळांना ‘खेलो इंडिया’ मुळे मिळाला उजाळा

मैदानी खेळांना ‘खेलो इंडिया’ मुळे मिळाला उजाळा

Next
ठळक मुद्देरामदास तडस : खासदार चषक विदर्भस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : परंपरागत खेळाचा राजाश्रय संपल्याने मधल्या काळात बऱ्याचशा खेळांना अवकळा आली होती. परंतु आजच्या स्थितीत ‘खेलो इंडिया’ व ‘सीएम’ चषकाच्या आयोजनातून कबड्डी व कुस्तीच्या खेळाला उजाळा मिळाला आहे. तसेच हे मैदानी खेळ जीवंत ठेवण्यासाठी प्रयत्न होत आहे, असे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.
देवळी येथील विदर्भ केसरी खासदार तडस स्टेडीयमवर फे्रन्डस् ग्रुपच्यावतीने खासदार चषक विदर्भस्तरीय पुरूष व महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून सहकार नेते व माजी आमदार प्रा.सुरेश देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सभापती मिलिंद भेंडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनंत देशमुख, साबाजी स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष मोहन अग्रवाल, नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, गटनेता शोभा तडस व उद्योजक विनोद घीया यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना १०० खेळाडूंना दत्तक घेवून त्यांना धडे दिले जाणार आहे. तसेच पुढच्या वर्षी कुस्तीचे हिंद केसरी सामने, कबड्डीची आॅल इंडिया स्पर्धा व व्हॉलीबॉलचे राज्यस्तरीय सामने आयोजित करणार असल्याचे खा. तडस यांनी सांगितले. राष्ट्रीय स्तरावरील हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचला आहे. खेळाला चांगले दिवस आणण्यासाठी सर्वस्तरीय प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मत सहकार नेते प्रा. सुरेश देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. प्रारंभी पुलवामा घटनेतील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. १७ ते १९ फेब्रुवारीपर्यंत होणाºया या स्पर्धेसाठी विदर्भातील महिला व पुरूष गटातील ३४ संघ सहभागी झाले आहे. खुल्या गटातील ही स्पर्धा पाहण्यासाठी देवळी व परिसरातील क्रीडाप्रेमींनी गर्दी केली आहे.
उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक निलेश कसनारे व संचालन अंकुश देशमुख यांनी केले. तर आभार तेजस देशमुख यांनी मानले. या कार्यक्रमाला नगर परिषदेचे सभापती नंदू वैद्य, मारोती मरघाडे, मिलिंद ठाकरे तसेच अमोल कसनारे, प्रणव जोशी यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी मंगेश वानखेडे, स्वप्नील राऊत, गिरीष तुमाने, किशोर कामडी, योगेश नाखले, विनोद तराळे, आसीफ ईकबाल, मुरली लेखनार, गोलू तराळे, प्रवीण तराळे, गोल्डी बग्गा, भरत फटींग व कार्यकर्र्ते परिश्रम घेत आहे.

Web Title: Outdoor sports were found by 'Play India'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.