अन्यथा मुख्यमंत्र्यांना धडा शिकविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:53 PM2017-11-24T23:53:28+5:302017-11-24T23:53:40+5:30

धनगर समाजाने २०१३-१४ मध्ये कॉगे्रस-राष्ट्रवादीच्या काळात आंदोलनांतून आरक्षणाची मागणी लावून धरली; पण शासनाने कार्यवाही केली नाही. विरोधात असताना देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाची बाजू मांडली.

Otherwise, the Chief Minister will teach the lesson | अन्यथा मुख्यमंत्र्यांना धडा शिकविणार

अन्यथा मुख्यमंत्र्यांना धडा शिकविणार

Next
ठळक मुद्देधनगर समाज आरक्षण : नागपूर अधिवेशनात हल्लाबोल मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : धनगर समाजाने २०१३-१४ मध्ये कॉगे्रस-राष्ट्रवादीच्या काळात आंदोलनांतून आरक्षणाची मागणी लावून धरली; पण शासनाने कार्यवाही केली नाही. विरोधात असताना देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाची बाजू मांडली. सत्तेत आल्यावर आरक्षण देऊ, असे पत्र १० मार्च २०१४ रोजी दिले. आज सत्ता येऊन तीन वर्षे झाली; पण अंमल केला नाही. यामुळे एक-दीड महिन्यात अनु. जमातीच्या सवलती मिळाल्या नाही तर लबाड मुख्यमंत्र्यांना धनगर समाज धडा शिकवेल, असा इशारा माजी आमदार तथा भारिप बहुजन महासंघ अकोल्याचे हरिभाऊ भदे यांनी पत्रपरिषदेतून दिला.
धनगर समाजाला अनु. जमाती प्रवर्गाच्या सवलती देण्याच्या मागणीसाठी ११ डिसेंबर रोजी नागपूर विधिमंडळावर हल्लाबोल मोर्चा आयोजित आहे. याबाबत माहिती देण्याकरिता शुक्रवारी विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. ते पुढे म्हणाले की, भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात धनगर समाजाला अनु. जमातीचे आरक्षण आहे. याबाबत सबळ पुरावे आहेत; पण काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार धनगर समाजाला एसटीचे आरक्षण का देत नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी बारामती येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण सुरू होते. हे उपोषण फडणवीस यांनी सोडविले. तेव्हा धनगर समाजाने एक गठ्ठा मते आम्हाला द्यावी, आमचे सरकार सत्तेवर आल्यास धनगर समाजाच्या एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी करू, अशी ग्वाही दिली होती. लोकसभा निवडणूक प्रचारात नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या सभेत धनगर समाज मागासलेला आहे. धनगर समाजाला अनु. जमातीचे आरक्षण आवश्यक आहे. केंद्रात सरकार आल्यास आदेश काढू, अशी ग्वाही दिली होती. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर नागपूर येथे ४ जानेवारी २०१५ रोजी धनगर समाजाने त्यांचा सत्कार केला. त्यावेळीही फडणवीस यांनी धनगर समाजामुळेच मी मुख्यमंत्री झालो. मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर समाजाच्या अनु. जमातीच्या आरक्षणाचा ठराव पारित करतो. केंद्र सरकारकडे पाठवितो, असे सांगितले होते. मंत्रिमंडळाच्या शेकडो बैठका झाल्या; पण कार्यवाही झाली नाही. यामुळे भाजपा सरकारवर राग व्यक्त करण्यासाठी तथा सत्तेतून बाहेर करण्यासाठी नागपूर विधी मंडळाच्या पहिल्याच दिवशी लाखोंच्या संख्येने धनगर समाज रस्त्यावर उतरणार आहे.
धनगर समाजाच्या अनु. जमाती आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी. शासकीय सेवेत असणाºया धनगर समाजाच्या कर्मचाºयांची सेवा बढती थांबविली. मेंढपाळासाठी संरक्षित चराई क्षेत्र उपलब्ध करून द्यावे. अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी महामंडळाद्वारे १०० टक्के अनुदानावर केवळ धनगर समाजाला शेळी-मेंढी उद्योगासाठी तरतूद करावी. धनगर समाजाला वनविभागाने सरंक्षण देणारा कायदा पारित करावा आदी मागण्या मोर्चातून लावून धरण्यात येणार असल्याचेही सांगितले. यशवंत स्टेडीयम नागपूर येथून मोर्चाची सरूवात होणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी धनगर समाज युवक मंडळ नागपूरचे अध्यक्ष रमेश पाटील, माजी जि.प. अध्यक्ष पुरूषोत्तम डाखोळे नागपूर, राजू गोरडे वर्धा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Otherwise, the Chief Minister will teach the lesson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.