तीन ट्रकच्या धडके त एक ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 09:57 PM2019-02-18T21:57:17+5:302019-02-18T21:57:31+5:30

वर्धा ते नागपूर या महामार्गाचे सिमेंटीकरण व विस्तारीकरणाचे काम मागील सहा महिन्यांपासून सुरु आहे. ठिकठिकाणी रस्त्याचे अर्धवट काम व रस्ता वळविला असल्याने अपघातात वाढ होत आहे. मागील सहा महिन्याच्या कालावधीत या मार्गावर तिघांना जीव गमवावा लागला. सोमवारी दुपारी १२ वाजता याच मार्गावरील मामा-भांज्या यांच्या दर्गाहाजवळ तीन ट्रकची भीषण धडक झाल्याने एका चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या ट्रकचा चालक गंभीर आहे.

One killed and two injured in three trucks | तीन ट्रकच्या धडके त एक ठार, दोन जखमी

तीन ट्रकच्या धडके त एक ठार, दोन जखमी

Next
ठळक मुद्देसहा महिन्यांत तिघांचा घेतला बळी : किरकोळ अपघात नेहमीचेच

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : वर्धा ते नागपूर या महामार्गाचे सिमेंटीकरण व विस्तारीकरणाचे काम मागील सहा महिन्यांपासून सुरु आहे. ठिकठिकाणी रस्त्याचे अर्धवट काम व रस्ता वळविला असल्याने अपघातात वाढ होत आहे. मागील सहा महिन्याच्या कालावधीत या मार्गावर तिघांना जीव गमवावा लागला. सोमवारी दुपारी १२ वाजता याच मार्गावरील मामा-भांज्या यांच्या दर्गाहाजवळ तीन ट्रकची भीषण धडक झाल्याने एका चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या ट्रकचा चालक गंभीर आहे.
गोपाल गुप्ता (४५) रा. नालासोपारा, असे मृतक चालकाचे नाव आहे. तर अकरम शेख मुर्शिदाबाद हा चालक गंभीर जखमी असून त्याच्यावर सेवाग्राम येथे उपचार सुरु आहे. पवनार ते वर्धा दरम्यान असलेल्या मामा-भांज्या यांच्या दर्गाहाजवळ एम. एच. ४८ ए. वाय. ९९३२, डब्ल्यू. बी. ११ डी. ७५०९ क्रमांकाचे ट्रक आणि सी. जी. ०४ जे. बी. ९२७३ क्रमांकांचा ट्रेलर, या तिन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. वर्धेकडून एक ट्रक नागपूरकडे जात होता तर एक ट्रक व ट्रेलर नागपुरवरुन वर्धेकडे येत होता. या दरम्यान नागपूरकडून वर्धेकडे येणाºया ट्रकने समोरील ट्रेलरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरुन येणाºया ट्रकला जबर धडक दिली. यामुळे तिन्ही वाहने एकमेकांना धडकली. यात एम. एच. ४८ ए. वाय. ९९३२ क्रमांकाच्या ट्रकचा चालक गोपाल गुप्ता याचा स्टेअरींग व सीटमध्ये अडकून जागीच मृत्यू झाला. तर डब्ल्यू. बी. ११ डी.७५०९ क्रमांकाच्या ट्रकचा चालक अकरम शेख मुर्शिदाबाद हा गंभीर जखमी झाला. तसेच सी.जी.०४ जे. बी. ९२७३ क्रमांकांच्या ट्रेलरचा चालक सलीउद्दीन खान हा किरकोळ जखमी झाला.
सेवाग्राम पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक बोठे व कर्मचारी किटे यांनी घटनास्थळ गाठून के्रनच्या सहाय्याने वाहने बाजुला करीत फसलेल्या मृतकाला बाहेर काढले. त्याच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देत मृतदेह शवविच्छेदनाकरिता सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. या मार्गाचे काम धिम्यागतीने सुरु असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी एका शिक्षिकेला व दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागला. मागील सहा महिन्यात जवळपास दहा पेक्षा जास्त अपघात झाले असून काहींना अपंगत्व आले आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Web Title: One killed and two injured in three trucks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.