जखमीला घेवून गावकरी उपवनसंरक्षक कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 01:07 AM2017-07-25T01:07:35+5:302017-07-25T01:07:35+5:30

धामणगाव (वाठोडा) शिवारात सोमाजी कासार यांच्यावर रानडुकराने हल्ला चढविला.

In the office of the Deputy Conservator of Forest | जखमीला घेवून गावकरी उपवनसंरक्षक कार्यालयात

जखमीला घेवून गावकरी उपवनसंरक्षक कार्यालयात

googlenewsNext

रानडुकराचा शेतकऱ्यावर हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: धामणगाव (वाठोडा) शिवारात सोमाजी कासार यांच्यावर रानडुकराने हल्ला चढविला. त्याला शासकीय मदत मिळत नसल्याने गावकऱ्यांनी त्यांना थेट उपवनसंरक्षक कार्यालयात आणले. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा प्रकार सोमवारी सकाळी घडला.
शेतकरी सोमाजी कासार हे सोमवारी शेतात बकऱ्या चारत असताना त्यांच्यावर झुडपात लपून असलेल्या रानडुकराने अचानक हल्ला केला. यात सोमाजी कासार गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामस्थांनी थेट मालवाहू वाहनात ठेऊन या भागातील वन्य प्राण्यांच्या हैदोसाचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी उपवनसंरक्षक कार्यालय गाठले. जखमीला घेऊन काही नागरिक उपवनसंरक्षक कार्यालयात आल्याची माहिती मिळताच वर्धा वन परिक्षेत्र अधिकारी एस. एस. बन्सोड यांनी कार्यालयात येऊन ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले.
या समस्येवर मार्ग काढण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेतून मार्ग निघाल्याने जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले.

अधिकाऱ्यांनी दिला माणुसकीचा परिचय
रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकरी सोमाजी कासार यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीची आर्थिक परिस्थिती नाजुक असल्याचे लक्षात येताच वर्धा वन परिक्षेत्र अधिकारी एस. एस. बन्सोड यांनी माणुुसकीचा परिचय देत तात्काळ स्वत: जवळील २ हजार रुपये जखमीच्या उपचाराकरिता कर्मचाऱ्यांच्या हाताने रुग्णालयात पाठविले. जखमीला लवकरात लवकर शासकीय मदत देण्यात येईल, असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: In the office of the Deputy Conservator of Forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.