खासदारांनी स्वीकारले ‘एव्हीन’चे पालकत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:43 PM2018-03-20T23:43:04+5:302018-03-20T23:43:04+5:30

पीपल फॉर अ‍ॅनिमल्स द्वारा संचालित करूणाश्रम येथे समुद्रपूर परिसरात आढळलेल्या बिबट्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान येथे लावण्यात आलेल्या पिंजऱ्याच्या प्रदर्शनाला खा. रामदास तडस यांनी भेट दिली.

MPs accepted 'Avian's guardianship' | खासदारांनी स्वीकारले ‘एव्हीन’चे पालकत्व

खासदारांनी स्वीकारले ‘एव्हीन’चे पालकत्व

Next
ठळक मुद्देकरूणाश्रमात बिबट्यावर उपचार सुरू : उपचाराचा सर्व खर्च देण्याचे केले कबुल

ऑनलाईन लोकमत
वर्धा : पीपल फॉर अ‍ॅनिमल्स द्वारा संचालित करूणाश्रम येथे समुद्रपूर परिसरात आढळलेल्या बिबट्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान येथे लावण्यात आलेल्या पिंजऱ्याच्या प्रदर्शनाला खा. रामदास तडस यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी आश्रमाची माहिती घेतली. येथे एका जखमी बिबट्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळताच त्यांनी या संदर्भात विचारणा केली. दरम्यान त्याचे नाव ‘एव्हीन’ असल्याचे कळताच उपचाराचा संपूर्ण खर्च स्वीकारण्याचे कबुल केले.
वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील वसई कोरा भागात रस्त्यावर घडलेल्या अपघातात डोक्याला मार लागल्यामुले सदर बछड्याचे मागचे पाय लुळे झाले. त्यामुळे वर्धा वनविभागाने वनपरिक्षेत्र अधिकारी बाभळे यांच्याद्वारे औषध उपचाराकरीता सदर बिबट्यास करुणाश्रमात दाखल केले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात सदर बछड्यावर शर्थीचे प्रयत्न करून उपचार चालू आहे. या उपचारांमुळे या बछड्याची तब्येतीत सुधारणा होत आहे. त्याचे नामकरण ‘एव्हीन’ असे करण्यात आले. पूर्वस्थितीत येण्याकरिता त्याच्यावर दीर्घकाळ उपचार करावे लागणार असल्याची शक्यता पशु वैद्यकीय अधिकाºयांनी वर्तविली आहे. या उपचारांना लागणारा प्रत्यक्ष खर्च व इतर व्यवस्था सध्या संस्था करीत आहे.
वर्धेचे खा. रामदास तडस यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी करुणाश्रमात भेट दिली व स्वत: या बिबट्याची पाहणी केली. करूणाश्रम हे वर्धा जिल्ह्याचे भूषण असून या चांगल्या कार्यात माझा सहभाग देऊन बिबट्याच्या आरोग्य सुधारण्या पर्यंतचा संपूर्ण खर्च त्यांनी देऊ केला. एव्हीन नामक बिबट्याच्या बछड्याचे पालकत्व स्वीकारण्याचे जाहीर केले. प्रकल्प स्थळावरून पिपल फॉर अ‍ॅनिमल्सच्या राष्ट्रीय अध्यक्ष मेनका गांधी यांच्याशी संवाद साधला व संस्थेच्या उपक्रमाबाबत माहिती दिली. भविष्यात वन्यप्राण्यांकरिता पिंजरे उभारणीकरिता खासदार निधीतून मदत करण्याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिली.
एकमेव पशु अनाथ आश्रम
पिपल्स फॉर अ‍ॅनिमलचे करूणाश्रम हे वर्धा जिल्ह्यातील एकमेव पशु अनाथ आश्रम आहे. आपातकालीन स्थितीत सापडलेल्या प्राण्यांना मायेची सावली देणारे हे पशु अनाथ आश्रम आहे. अपघातात जखमी झालेल्या प्राण्यांना ठेवण्यासाठी भारतीय जीवजंतू कल्याण बोर्डसह केंद्रीय चिडीयाघर प्राधिकरण तसेच महाराष्ट्र प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची मान्यता प्राप्त आहे. प्राण्यांना विविध सेवा उपलब्ध असलेल्या या पशु आश्रमात नुकतेच काही दिवसांपूर्वी एका सहा महिन्याच्या बिबट्याच्या बछड्याचे आगमन झाले आहे.

Web Title: MPs accepted 'Avian's guardianship'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.