आमदारांनी बोगस कामगंध सापळे पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 10:57 PM2018-08-13T22:57:22+5:302018-08-13T22:57:44+5:30

जिल्ह्यात यंदाही बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना कामगंध सापळे लावण्याचे आवाहन केले आहे.

MLAs caught bogus sex traps | आमदारांनी बोगस कामगंध सापळे पकडले

आमदारांनी बोगस कामगंध सापळे पकडले

Next
ठळक मुद्देपंकज भोयर यांची शिवारभेट : कंपनीला विक्रीबंदचे निर्देश देणार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात यंदाही बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना कामगंध सापळे लावण्याचे आवाहन केले आहे. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी शिवारभेटीदरम्यान सेलू तालुक्यातील मोही येथील शेतकऱ्यांच्या शेतात भेट देऊन कामगंध सापळ्याची पाहणी केली असता त्यातील फोलपणा उघड झाला व हे सापळे बोगस असल्याचे आमदारांच्या निदर्शनास आले. याची विक्री थांबविण्याचा सूचना त्यांनी दिल्या.
आमदार डॉ. पंकज भोयर यांनी बोंडअळींची सद्यास्थिती काय आहे. हे पाहण्यासाठी शेतावर प्रत्यक्ष भेट दिली. त्यावेळी मोही येथील शेतकरी राजेंद्र जाधव यांच्या कपाशीच्या शेतात राजेंद्र जाधव यांच्या कपाशीच्या शेतात लावलेले कामगंध सापळ्याचे निरीक्षण केले. सापळ्यात एकदही नरतपंग आढळला नाही. तर कपाशीच्या बोंडावर पांढरी व गुलाबी या दोन्ही प्रकारच्या बोंडअळ्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्या. शेतात लावलेल्या कामगंध सापळ्यातील बोंडअळीच्या मादीच्या वासाचे कृत्रिम गंध असलेले लुयर कॅप्सूल बोगस असल्याची शंका आमदार भोयर यांनी व्यक्त केली. कृषी अधिकाऱ्यांनी या शेतावर पाठवून सत्य परिस्थितीचे निरीक्षण करण्यास सांगणार आहे. या शेतात लावलेले कामगंध सापळे प्रभावहीन असतील तर ज्या कंपनी हे तयार केले त्याच्या विक्रीवर तात्काळ बंदी आणली जाईल, असे शिवारातील शेतकºयांना आमदारांनी आश्वासन दिले. कामगंध सापळ्यातील मु्ख्य काम त्यामधील लाल रंगाच्या लुयर कॅप्सूलच असते. त्याला मादी बोंडअळीचा कृत्रिम गंध दिला असून नरपतंग त्यामध्ये अडकून प्रजजन प्रक्रियेला खीळ बसते व बोंड निरोगी राहण्यास मदत होते. कंपन्या अधिक नफा कमविण्यसासाठी शेतकºयांच्या माथी बोगस सापळे मारत आहे. कामगंध सापळ्यांचा दर्जा तपासून ते बोगस आढळल्यास कंपन्यांवर कारवाई करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शिवारभेटीदरम्यान, पंचायत समिती सदस्य अशोक मुडे, जि.प. सभापती सोनाली कलोडे, विलास वरटकर, अनिल शिंदे, संदीप चव्हाण, विजय खोडे, वसंत भांदककर व शेतकरी उपस्थित होते.
बोगस सापळ्यांची जिल्हाभरात तक्रार
कृषी केंद्र विक्रेत्यांकडून तसेच बाजार समित्यांमधून शेतकऱ्यांना सापळ्यांचे वितरण करण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाने सांगितल्यानुसार सापळे एकराप्रमाणे आपल्या शेतात लावले. मात्र या सापळ्यांमध्ये पतंग सापडतच नाही, अशा तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी केल्या आहे. बाजारात असलेले बहुतांश सापळे बोगस असल्याची शक्यता आहे.

Web Title: MLAs caught bogus sex traps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.