Lok Sabha Election 2019; लोकप्रतिनिधी म्हणून सदैव समाजविरहीत काम केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 10:32 PM2019-04-09T22:32:04+5:302019-04-09T22:35:21+5:30

आम्ही कुठली जात-धर्म, भाषा, पंथाच्या नावावर राजकारण करीत नाही. जनसामान्यांच्या हितासाठी मी कधीच जातीय व धार्मिक राजकारण केले नाही. ज्यांनी मला मदत मागतिली, त्यांना मदत करण्यास मी सदैव तत्पर राहिलेलो आहे.

Lok Sabha Election 2019; As a representative, he always worked without any social work | Lok Sabha Election 2019; लोकप्रतिनिधी म्हणून सदैव समाजविरहीत काम केले

Lok Sabha Election 2019; लोकप्रतिनिधी म्हणून सदैव समाजविरहीत काम केले

Next
ठळक मुद्देरामदास तडस : मुस्लीम समाजाच्या मेळाव्यात मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आम्ही कुठली जात-धर्म, भाषा, पंथाच्या नावावर राजकारण करीत नाही. जनसामान्यांच्या हितासाठी मी कधीच जातीय व धार्मिक राजकारण केले नाही. ज्यांनी मला मदत मागतिली, त्यांना मदत करण्यास मी सदैव तत्पर राहिलेलो आहे. आमदार झाल्यानंतर महाराष्ट्रात मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानाला निधी आणणारा पहिला आमदार आहे, असे प्रतिपादन भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार रामदास तडस यांनी केले. वर्धा येथे मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी मंचावर उमेदवार रामदास तडस, नगराध्यक्ष अतुल तराळे, भाजपा शहर अध्यक्ष प्रशांत बुरले, नगरपालिकेचे सभापती नौशाद शेख, जिल्हा परिषद सदस्य राणा रणनवरे, रवींद्र कोटंबकर, राहुल, तौफीकभाई, अल्पसंख्याकचे दत्तू कुरेशी, इंद्रिसभाई, एजाज भाई उपस्थित होते.
यावेळी रामदास तडस म्हणाले, देवळी नगरपरिषदेमध्ये दोनवेळा मुस्लिम समाजाचा नगराध्यक्ष यामध्ये जब्बारभाई तवंर व अब्दुल गफ्फारभाई, पुलगावला साबिर कुरैशी यांना नगराध्यक्ष बनविले आहे. कोणत्याही समाजाच्या प्रगतीची जबाबदारी ही सरकारची असते. परंतु, यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. हजला जाणाऱ्या यात्रेकरुंकरिता विदर्भातील पहिल्या पारपत्र कार्यालयाची वर्धा येथे सुरुवात केली. यामुळे पासपोर्ट काढणे सोपे झाले आहे.
भाजपाचे सरकार हे सर्व समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. याकरिता वर्धा लोकसभा क्षेत्राची पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी देण्याकरिता आपण सर्वांनी मदत करावी,असे आवाहन यावेळी तडस यांनी उपस्थित मुस्लिम समाजबांधवांना केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनीही समाजबांधवांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन काजी यांनी केले तर आभार हुसेन भाई यांनी मानले. कार्यक्रमाला अब्दुल रशीद, जाकीर अली, अजहर खान, जफर जावेद, तुरक साब, शेख साब, खान साब व मोठ्या संख्येने मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाला मुस्लिम समाजाच्या बांधवांनीही मार्गदर्शन केले. यावेळी वर्धा शहरासह परिसरातील मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Web Title: Lok Sabha Election 2019; As a representative, he always worked without any social work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.