Lok Sabha Election 2019; जिल्ह्यात सर्वत्र महिला मतदारांचा प्रचंड उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 10:54 PM2019-04-11T22:54:18+5:302019-04-11T22:55:19+5:30

लोकसभा मतदारसंघात महिला मतदारांचा मतदानात प्रचंड उत्साह दिसून आला. लोकसभा मतदार संघातील २ हजार २६ मतदान केंद्रांवर महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले.

Lok Sabha Election 2019; The enthusiasm of women voters everywhere in the district | Lok Sabha Election 2019; जिल्ह्यात सर्वत्र महिला मतदारांचा प्रचंड उत्साह

Lok Sabha Election 2019; जिल्ह्यात सर्वत्र महिला मतदारांचा प्रचंड उत्साह

Next
ठळक मुद्देकेंद्रांवर महिलांच्याच रांगा : मतदानाचा टक्का वाढविला

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लोकसभा मतदारसंघात महिला मतदारांचा मतदानात प्रचंड उत्साह दिसून आला. लोकसभा मतदार संघातील २ हजार २६ मतदान केंद्रांवर महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले.
अनेक मतदान केंद्रांवर दिवसभर महिलांच्या रांगा दिसून येत होत्या. काही मतदान केंद्र तर महिलांनीच भरून असल्याचे दिसून आले. महिला मतदारांच्या या वाढत्या टक्क्यामुळे निवडणुकीच्या निकालावरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. वर्धा लोकसभा मतदार संघात एकूण ८ लाख ४८ हजार ७०१ महिला मतदार आहेत. सायंकाळी ५ वाजेपर्यंत वर्धा लोकसभा मतदार संघात ४ लाख ३६ हजार १८१ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. धामणगाव (रेल्वे) विधानसभा मतदार संघात १ लाख ५३ हजार २९ महिला मतदारांपैकी ७५ हजार ७८३, मोर्शी मतदार संघात १ लाख ३९ हजार मतदारांपैकी ७१ हजार ७८२ महिला मतदारांनी मतदान केले. आर्वी विधानसभा क्षेत्रात १ लाख २७ हजार १८८ मतदारांपैकी ७० हजार ८८१ मतदारांनी मतदान केले. देवळी मतदार संघात १ लाख ३१ हजार ४५६ मतदारांपैकी ६६ हजार ९८७ महिला मतदारांनी मतदान केले. हिंगणघाट येथे १ लाख ४३ हजार १८ महिला मतदारांपैकी ७५ हजार ८३७ मतदारांनी मतदान केले. वर्धा विधानसभा मतदार संघात १ लाख ५५ हजार ५० मतदारांपैकी ७४ हजार ९११ मतदारांनी मतदान केले. लोकसभा क्षेत्रातील ८ लाख ४८ हजार ७४१ महिला मतदारांपैकी ४ लाख ३६ हजार १८८ मतदारांनी केले. जवळपास ५१.३९ टक्के महिलांनी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला. विविध ठिकाणी महिला मतदारांच्या रांगा मोठ्या प्रमाणावर लागून होत्या. महिला मतदारांमध्ये नवमहिला मतदारही मोठ्या प्रमाणात मतदानासाठी आल्या. महिलांची ही मतदानाची टक्केवारी पाहता या मतदारसंघात महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदान केल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019; The enthusiasm of women voters everywhere in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.