तीन वर्षांत ५६ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 11:10 PM2017-12-13T23:10:44+5:302017-12-13T23:11:36+5:30

शेतकरी आत्महत्यांनी अख्खा जिल्हा ढवळून निघत आहे. विविध उपाययोजना केल्यानंतरही तालुक्यात जानेवारी २०१५ ते २२ सप्टेंबर २०१७ या तीन वर्षांच्या कालावधीत एकूण ५६ शेतकऱ्यांनी मृत्यू जवळ केला आहे.

Life span ended 56 farmers in three years | तीन वर्षांत ५६ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

तीन वर्षांत ५६ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

Next
ठळक मुद्दे ३८ आत्महत्या ठरल्या पात्र : १९ कुटुंबीयांना नाकारली मदत

सुरेंद्र डाफ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : शेतकरी आत्महत्यांनी अख्खा जिल्हा ढवळून निघत आहे. विविध उपाययोजना केल्यानंतरही तालुक्यात जानेवारी २०१५ ते २२ सप्टेंबर २०१७ या तीन वर्षांच्या कालावधीत एकूण ५६ शेतकऱ्यांनी मृत्यू जवळ केला आहे. आर्थिक संकटाला कंटाळून या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद महसूल विभागाने घेतली आहे.
सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून २६ जानेवारी २०१५ या वर्षात तालुक्यात २२ शेतकºयांनी आत्महत्या केल्या. यापैकी पाच आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्यात. या आत्महत्या वडगाव, राजणी, आर्वी, सोरटा, चोरांबा, टाकरखेडा, सालफळ, सालधरा, मोरांगणा, पाचोड (ठाकूर), वाढोणा, मांडला, धनोडी, वाढोणा, चिंचोली (डांगे), विरूळ (आ.), धनोडी, टोणा या गावांतील आहेत.
२०१६ मध्ये २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात १४ शेतकरी आत्महत्या पात्र ठरविल्या असून सहा आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या. सर्कसपूर, सावळापूर, हैबतपूर, बेल्हारा, विरुळ, पाचेगाव, नांदपूर, खुबगाव, पिंपळगाव, जळगाव, टाकळी, आर्वी, बेल्हारा, रसुलाबाद, वर्धमनेरी, धनोडी, निंबोली (शेंडे), चिंचोली (डांगे), मदना आदी गावांतील ते शेतकरी होते.
२०१७ मध्ये १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात ७ आत्महत्या पात्र ठरल्या तर ८ आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या. दोन प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत. या शेतकरी आत्हत्या सोनेगाव, कर्माबाद, सोरटा, पिंपळा, आर्वी, पाचोड, सावरखेडा, आर्वी, बोथली (कि़), पाचोड, धनोडी, हुसेनपूर, रोहणा, डबलीपूर, लाडेगाव, अहिरवाडा या गावांत झाल्यात.
तालुक्यात तीन वर्षांत ५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या .आर्थिक विंवचनेतून झाल्या असताना १९ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. बहुतांश आत्महत्या विष प्राशन करून करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आलेले आहे. शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे कृषी धोरणाकडे गांभीर्याने पाहण गरजेचे झाले आहे. शासन, प्रशासन मात्र याबाबत गंभीर नसल्याचेच चित्र पाहावयास मिळत आहे.

Web Title: Life span ended 56 farmers in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.