...चला राष्ट्रध्वजाचा सन्मान राखूया !!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:26 AM2017-08-15T00:26:40+5:302017-08-15T00:29:00+5:30

Let's honor the national flag! | ...चला राष्ट्रध्वजाचा सन्मान राखूया !!

...चला राष्ट्रध्वजाचा सन्मान राखूया !!

googlenewsNext
ठळक मुद्देवीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे अभियान : माहितीसाठी पोलीस निरीक्षकांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशाच्या ध्वजाचा सन्मान करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. असे असले तरी राष्ट्रीय सणानंतर ध्वजांची अवहेलना होत असल्याचे सर्वश्रूत आहे. ध्वजाची अवहेलना टाळण्यास्तव अभियान राबविले जात आहे. वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेने यासाठी जनतेलाही, ‘चला राष्ट्रध्वजाचा सन्मान राखूया’, असे आवाहन केले जात आहे. या अभियानाबाबत माहिती देण्यासाठी रामनगरचे पोलीस निरीक्षक विजय मगर यांना निवेदन देण्यात आले.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या शहिदांनी प्राणांची आहुती दिली, ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी हालअपेष्टा सहन केल्या त्यांच्या बलिदानाचे फलित म्हणजे राष्ट्रध्वज. भातराच्या स्वतंत्र्याचे प्रतिक म्हणजे राष्ट्रध्वज. जाती, धर्म, पंथपेक्षाही श्रेष्ठ असा हा राष्ट्रध्वज; पण या देशाचे व आमचेही दुर्भाग्य की, याच राष्ट्रध्वजाचा अवमान १५ आॅगस्ट व २६ जानेवारी रोजी होतो. कागदी व प्लास्टिकचे राष्ट्रध्वज रस्त्यावर पडून असतात. राष्ट्रध्वजासाठी अनेकांनी आपल्या आयुष्याची होळी केली, तेच राष्ट्रध्वज पडलेले पाहून मन खिन्न झाल्याशिवाय राहत नाही. देशातील सामान्यांनाही राष्ट्रध्वजाचे महत्त्व कळावे, हाच राष्ट्रध्वज सन्मान अभियान राबविण्याचा उद्देश आहे.
शहिदांच्या प्राणांचे मोल देऊन आम्ही हा राष्ट्रध्वज फडकवला आहे. राष्ट्रध्वजाच्या रक्षणासाठी देशातील तरूणांनी सीमेवर रक्त सांडले. कित्येक सौभाग्यवतींनी कपाळाचे कुंकू हसत-हसत अर्पण केले. मातांनी तरूण पुत्र ध्वजाच्या तळपत्या तेजाला सहर्ष अर्पण केले. राष्ट्रध्वज हा कोणत्याही राष्ट्राचा प्राण असतो. तो प्राणपणानेच जपला पाहिजे. यासाठी व्हीबीव्हीपीचे १७० विद्यार्थ्यांचे पथक हा उपक्रम राबवित आहे. जिल्ह्यातील नागरिक, शिक्षक, विद्यार्थी, युवक-युवती, खळाडू व राजकीय पक्षातील पदाधिकाºयांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेने केले आहे.
पोलीस निरीक्षकांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष निरज बुटे, अभियान समितीचे वैष्णवी डाफ, शंतनू भोयर, अजिंक्य मकेश्वर, दुष्यंत ठाकरे, धिरज चव्हाण, शिवम भोयर, हेरॉल्ड डिक्रुझ, लोकेश साहू, निखील ठाकरे, अमोल थोटे, आशू चेर, पलक रोहनकर, कृतिका भोयर, निशा कोटंबकर, रक्षंदा बानोकर यासह पदाधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी केला ध्वज सांभाळा संकल्प
नाचणगाव - इंडियन मिलिटरी स्कूल पुलगाव येथील विद्यार्थ्यांनी सहायक शिक्षक अतुल वाकडे यांच्या मार्गदर्शनात एक संकल्प केला. १५ आॅगस्ट व २६ जानेवारी या दिवशी असंख्य भारतीय नागरिक राष्ट्रभक्ती म्हणून ध्वज विकत घेतात. हे एक राष्ट्रप्रेमाचे प्रतिक आहे; पण दुसºया दिवशी हे छोटे ध्वज रस्त्यावर पडलेले दिसतात. कचरा कुंडीत दिसतात. असे होऊ नये म्हणून यावर्षी घेतलेले ध्वज सांभाळून ठेवण्याची तसेच ते इतरत्र पडू नये म्हणून महत्त्वाचा संकल्प केला. सर्व नागरिकांना प्रार्थना केली की, ध्वज सांभाळून ठेवा. रस्त्याच्या कडेला ध्वज दिसला तर तो उचला. त्याचा अपमान होऊ देऊ नका. ध्वज विकत घेणे, हे राष्ट्रप्रेम आहे; पण तो सांभाळून ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ध्वज सांभाळा, असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला असून तसा संकल्प केला आहे.

Web Title: Let's honor the national flag!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.