पाल यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 11:10 PM2018-11-12T23:10:49+5:302018-11-12T23:11:12+5:30

हास्यकलाकार सुनील पाल यांच्या भगिनी शारदा पाल यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात सर्वोतोपरी उपचार करण्यात आले. परंतू त्या उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला.

Let us file a defamation suit against Pal | पाल यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करू

पाल यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करू

Next
ठळक मुद्देराजीव बोरले : आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाची पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : हास्यकलाकार सुनील पाल यांच्या भगिनी शारदा पाल यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात सर्वोतोपरी उपचार करण्यात आले. परंतू त्या उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. या सर्व घटनेसाठी सावंगी रुग्णालयाला जबाबदार ठरवित सुनील पाल यांनी व्हिडीओ व्हायरल करायला सुरुवात केली आहे. यात रुग्णालयासह संस्थाप्रमुख माजी खासदार दत्ता मेघे यांचीही बदनामी चालविली आहे. ही बाब गंभीर असून याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यासह सुनील पाल यांच्याविरुध्द मानहानीचा दावा करणार, अशी माहिती दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजीव बोरले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हास्य कलाकार सुनील पाल यांची बहीण शारदा पाल यांची प्रकृती आठ दिवसापूर्वीच खालावली होती. त्यांना गंभीर अवस्थेत ७ नोव्हेंबरला पहाटे ३ वाजता सावंगीच्या रुग्णालयात आणण्यात आले. त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केल्यानंतर औषोधोपचार सुरु केले पण, त्या प्रतिसाद देत नसल्याची माहिती नातेवाईकांना दिली होती. त्यानंतर ८ नोव्हेंबरला दुपारी सुनील पाल रुग्णालयात आले. त्यांनी कोणाचीही भेट न घेता अतिदक्षता विभागात जाऊन गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यांनी रुग्णालयात आरोग्य सेवा मिळत नाही. येथे अप्रशिक्षीत डॉक्टर सेवा देतात, असे आरोप करीत व्हिडीओ तयार करुन तो व्हायरल केला. विशेषत: त्यांच्या बहिणीवर या रुग्णायात केवळ ३६ तासच उपचार करण्यात आले. त्यापूर्वी हिंगणघाटच्या तुळसकर हॉस्पीटलमध्ये उपचार झाले. त्यांना या रुग्णालयात सर्व सुविधाही देण्यात आल्या व सहकार्यही केले. इतकेच नाही तर त्यांच्या बहिणीचा मृत्यू हा या रुग्णालयाच्या बाहेर झाला आहे. असे असतानाही त्यांनी रुग्णालयालासह येथील डॉक्टरांना दोष देत बदनामी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे खरच आमची चूक असेल तर आमच्यावर कारवाई व्हावी, सर्व चौकशी व कारवाईला सामोरे जाण्यास आम्ही तयार आहे. पण, पाल यांनी बदनामी थांबवावी. त्यांच्या विरुध्द आम्ही कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही यावेळी बोरले म्हणाले. या पत्रकार परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदिप श्रीवास्तव, रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर, डॉ. सुनील कुमार, डॉ. टी. के. कांबळे उपस्थित होते.
रुग्णाला आमच्याकडे सहकार्यच करण्यात आले
सावंगी रुग्णालय हे टिचिंग हॉस्पीटल आहे. सुनील पाल यांच्या व्हीडीओमध्ये दिसणारे आयसीयुतील आॅन ड्युटी असलेले आदित्य भागवत हे डॉक्टर असून सध्या मेडिसिनमध्ये पीजी करीत आहेत. रुग्णालयात शारदा यांची पूर्ण काळजी घेण्यात आली व योग्य तेच उपचार करण्यात आले. रुग्णाची अवस्था हाताबाहेर गेल्यानंतर रुग्णाला दवाखान्यात आल्यावरही आमच्याकडून सहकार्यच करण्यात आले, अशी माहिती याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव यांनी दिली.

Web Title: Let us file a defamation suit against Pal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.