प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 11:01 PM2018-09-24T23:01:32+5:302018-09-24T23:01:50+5:30

देशातील गरिबांना आजच्या महागाईच्या काळात चांगले उपचार घेणे सोयीस्कर व्हावे म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठी योजना देशातील गरिबांना समर्पित केली आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमुळे देशातील आणि जिल्ह्यातील गरिबांना चांगल्या आरोग्य सेवा मिळून त्यांना निरोगी आयुष्य जगता येईल, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.

Launch of Prime Minister Jan Swasthya Yojana | प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

Next
ठळक मुद्देरामदास तडस : १ लक्ष २९ हजार लाभार्थीना मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशातील गरिबांना आजच्या महागाईच्या काळात चांगले उपचार घेणे सोयीस्कर व्हावे म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठी योजना देशातील गरिबांना समर्पित केली आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमुळे देशातील आणि जिल्ह्यातील गरिबांना चांगल्या आरोग्य सेवा मिळून त्यांना निरोगी आयुष्य जगता येईल, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
विकास भवन येथे रविवारी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ खासदार तडस यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषद आरोग्य सभापती जयश्री गफाट, नगराध्यक्ष अतुल तराळे, माजी खासदार सुरेश वाघमारे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, सेवाग्राम हेल्थ सोसायटी अध्यक्ष डॉ.बी.एस. गर्ग उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी यावेळी बोलताना म्हणाले की, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा शुभारंभ झाल्यावर अनेक गरिबांनी वर्षानुवर्षे जखडलेल्या व्याधीवर उपचार करून घेतले आहेत. त्या योजनेचा जसा लाभ अनेक रूग्णांनी घेतला तसाच आयुष्यमान भारत योजना रूग्णांसाठी वरदान ठरेल. सामाजिक जाणीवेच्या भावनेतून ही योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आरोग्य सभापती जयश्री गफाट यांनी सर्व अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांना सदर योजना गावातील गरिबांना समजावून सांगण्याचे आवाहन केले. यावेळी नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी मनोगत व्यक्त केले. पुढे बोलताना तडस म्हणाले, या योजनेचा जिल्ह्यातील १ लक्ष २९ हजार १०९ लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. एका वर्षात एका कुटुंबाला ५ लक्ष रूपयांचा आरोग्य विमा या योजनेद्वारे मिळणार आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते निवडक लाभार्थ्यांना ई-कार्डाचे वाटप करण्यात आले. रांची येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या योजनेच्या कार्यक्रमाचे प्रसारण सभागृहात दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी यांनी तर आभार अजय डवले यांनी मानले.

Web Title: Launch of Prime Minister Jan Swasthya Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.