करारनाम्यावरच रखडली भूसंपादन प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 10:19 PM2019-07-20T22:19:28+5:302019-07-20T22:20:43+5:30

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाकरिता जमीन संपादनाचा करारनामा करण्यात आला; मात्र चार महिने लोटूनही मौजा पिपरी (मेघे), पांढरकवडा येथील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती पडितच ठेवली.

Land acquisition process on the contract | करारनाम्यावरच रखडली भूसंपादन प्रक्रिया

करारनाम्यावरच रखडली भूसंपादन प्रक्रिया

Next
ठळक मुद्देशेतीही पडित । न्याय न मिळाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाकरिता जमीन संपादनाचा करारनामा करण्यात आला; मात्र चार महिने लोटूनही मौजा पिपरी (मेघे), पांढरकवडा येथील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती पडितच ठेवली. अन्यायग्रस्त शेतकºयांनी मोबदला तातडीने देण्याची मागणी केली असून अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग इंटरचेंजसाठी लागणाऱ्या जमिनीकरिता १८ जानेवारी २०१९ ला सूचना प्रसिद्ध करण्यात आली. यानंतर भूसंपादनाची घोषणा करण्यात आली. पिपरी (मेघे), पांढरकवडा येथील ८७ शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्याबाबत जाहीर सूचना देण्यात आली. शेतकºयांनी भूमापनाकरिता संमती दिल्यानंतर मोजणी झाली. या प्रक्रियेअंतर्गत उपविभागीय अधिकारी, वर्धा यांच्याकडे आक्षेप मागविण्यात आले होते. भूसंपादनाकरिता दाव्याची रक्कम व तपशील अर्ज करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. एमएसआरडीसीतर्फे १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर जमीन संपादनाचा करारनामा करण्यात आला. मोबदल्याच्या रकमेविषयी शेतकºयांना अवगत करण्यासोबतच पैसे आठ दिवसांत जमा होतील, शेती करू नका असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यातील अनेक शेतकऱ्यांनी जमीन घेण्याकरिता दुसरीकडे पैसे देऊन करारनामा केला. महिनाभरानंतर शेतकरी विचारणा करण्यास गेले असता डिझाईन चेंज झाल्याचे कारण पुढे करण्यात आले. या दरम्यान समृद्धी महामार्गाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत करारनामे झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नसल्याबाबत ठामपणे सांगण्यात आले. मात्र चार महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. दुसरीकडे शेती पडीत ठेवल्याने नुकसान झाले. करार केलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा; अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा पिपरी, पांढरकवडा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.

Web Title: Land acquisition process on the contract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.