‘जलयुक्त’ ठरले ‘उपयुक्त’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:51 PM2018-01-10T23:51:14+5:302018-01-10T23:52:34+5:30

मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आला. या अभियानात पाणी अडवा पाणी जिरवा म्हणत मोठ्या प्रमाणात पैसाही जिरला. असे असले तरी वर्धेत या अभियानातून लाभच झाल्याचे समोर आले आहे.

 'Junker' proved 'useful' | ‘जलयुक्त’ ठरले ‘उपयुक्त’

‘जलयुक्त’ ठरले ‘उपयुक्त’

Next
ठळक मुद्देपाण्याच्या पातळीत वाढ : सिंचनाचा लाभ, नव्या वर्षात १३८ गावांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आला. या अभियानात पाणी अडवा पाणी जिरवा म्हणत मोठ्या प्रमाणात पैसाही जिरला. असे असले तरी वर्धेत या अभियानातून लाभच झाल्याचे समोर आले आहे. यामुळेच वर्धेत जलयुक्त चांगलेच उपयुक्त ठरल्याचे बोलले जात आहे.
या अभियानातून मोठ्या प्रमाणात छोटे-मोठे नाले, नदी खोलीकरणासह आदी कामे हातात घेऊन ती प्रभावीपणे केली गेल्याने जिल्ह्यातील भूगर्भातील पाणी पातळीत सुमारे दीड मिटरने वाढल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्याचा शेतकºयांसह नागरिकांना फायदा होत असून सिंचनाच्या क्षेत्रातही वाढ झाल्याचे दिसत आहे.
पाण्याची वाढती समस्या लक्षात घेवून ५ डिसेंबर २०१४ पासून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात जलयुक्त शिवार योजना राबविण्याचे निश्चित झाले. त्यासाठी कृषी विभाग, वन विभाग, लघु सिंचन विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा आदींचा ताळमेळ जुळवत नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात आला. यात काही जलतज्ज्ञांचेही मार्गदर्शन घेण्यात आले.
सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून करण्यात आली. जिल्ह्यात प्रथम वर्षाला २१४ गावांची निवड करून पावसाचे पाणी ठिकठिकाणी कसे अडविता येईल व त्याचे संवर्धन कसे करता येईल यादृष्टीने एकूण ३ हजार ३०० कामे करण्यात आली. त्यावर ७२.३१ कोटींचा निधी खर्च करण्यात आला. तर सन २०१६-१७ मध्ये २१२ गावांची निवड करून ६६.८१ कोटींचा निधी खर्च करून २ हजार २४४ कामे पूर्णत्वास आली. दोन वर्ष सतत ढाळीचे बांधबंदिस्ती, सलग समतल चर, सिमेंट नाला बांधणे, नाला खोली करण, नदी पात्रांचे खोलीकरण, गावतलावांची दुरूती तसेच खोलीकरण आदी कामे करून न थांबता यंदाच्या वर्षी १३८ गावांची निवड करीत ६७ कामे हाती घेण्यात आली. त्या कामांवर २.४ कोटींचा खर्च होणार असून बहूतांश कामे पूर्णत्वास नेण्यात आली आहे. तर जी कामे अर्धवट स्थितीत आहेत ती पूर्णत्वास नेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
९७ हजार हेक्टरला संरक्षित सिंचन
जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून जिल्ह्यात ९७ हजार ५८५ हेक्टरला संरक्षित सिंचनाचा लाभ मिळाला आहे. या कामांमुळे ४८ हजार ३७५ दश हजार घनमिटर पाणी साठविण्यास मदत झाली.
राज्यात दोन मॉडेल राबविणार
जिल्ह्यातील दोन मॉडेल राज्य सरकारने जलसंवर्धनाच्या हेतूने उपयुक्त असल्याने ते राज्यभºयात राबविण्याचे निश्चित केले आहे. हे दोन्ही मॉडेल कसे उपयुक्त आहेत त्याबाबतची माहिती जिल्ह्यातील संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी राज्य सरकारला वेळोवेळी दिली आहे. सदर मॉडेलला केंद्रस्थानी ठेऊन राज्यभºयात कामे होणार असल्याने वर्धा जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा नाविण्यपूर्ण कार्याबद्दल राज्यभरात पोहोचले आहे.

Web Title:  'Junker' proved 'useful'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.