जनाक्रोशाने प्रशासन घटनास्थळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 09:53 PM2019-02-18T21:53:58+5:302019-02-18T21:54:31+5:30

सेलू तालुक्यातील दहेगाव (गो.) येथील दोन शेतकºयांनी न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात रस्ता बंद केल्याने इतर शेतकºयांसह नागरिकांना चांगलीच अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे नागारिकांनी एकत्र येत ठिय्या आंदोलन करताच प्रशासनासह लोकप्रतिनिधींही घटनास्थळ गाठून त्यावर तोडगा काढला. त्यामुळे शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले.

Janakrushna administration at the place of incident | जनाक्रोशाने प्रशासन घटनास्थळी

जनाक्रोशाने प्रशासन घटनास्थळी

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : सेलू तालुक्यातील दहेगाव (गो.) येथील दोन शेतकºयांनी न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात रस्ता बंद केल्याने इतर शेतकºयांसह नागरिकांना चांगलीच अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे नागारिकांनी एकत्र येत ठिय्या आंदोलन करताच प्रशासनासह लोकप्रतिनिधींही घटनास्थळ गाठून त्यावर तोडगा काढला. त्यामुळे शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले.
दहेगाव (गो.) येथील रेल्वेरुळ ओलांडून जाण्यासाठी बोगदा असून या बोगद्यानंतरचा रस्ता हा नंदकिशोर शुक्ला तसेच सुशिला उपाध्याय यांच्या मालकीच्या शेतातून जातो.या बोगद्याच्या अलीकउे व पलिकडे लोकवस्ती आहे. तसेच सरकारी कार्यालये, स्मशानभूमी, शाळा, महाविद्यालय, पोलीस ठाणे आहे. इतर गावांना जोडणारा हा रस्ता आहे. न्यायालयाच्या आदेशाने शुक्ला व उपाध्याय यांनी चार दिवसापूर्वी पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करुन रस्ता बंद केला. त्यामुळे नागरिकांनी सोमवारी ठिय्या आंदोलन सुरु केले. या आंदोलनाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, रेल्वेचे विदर्भ प्रबंधक सोमेश्वर कुमार, खासदार रामदास तडस, आ. समीर कुणावार, माजी आ. राजू तिमांडे, जि.प.अध्यक्ष नितीन मडावी, जि.प. सदस्य विनोद लाखे यांनी नागरिकांची समजूत काढली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात तत्काळ बैठक बोलावली. त्या शेतकऱ्याला जागेचा मोबदला देत रस्ता मोकळा करण्याची हमी दिली. त्यामुळे नागरिकांनी हे आंदोलन मागे घेतले. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष अरुण उरकांदे, डॉ.धंदरे, संदीप वाणी तसेच गावातील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, महिल व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावला होता.

Web Title: Janakrushna administration at the place of incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.