स्वच्छता पाहून झाले चकित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 08:53 PM2018-11-10T20:53:56+5:302018-11-10T20:54:47+5:30

महाराष्ट्रातील अनेक रूग्णालये मी पाहिले आहे पण सेवाग्राम येथील कस्तुरबा दवाखाना मला सुसज्ज दिसून आला. सर्व व्यवस्था आणि स्वच्छता या ठिकाणी मला दिसल्याने ग्रामीण भागातील रूग्णालयाची व्यवस्था पाहून आनंद झाला असे प्रतिपादन आ. बच्चू कडू यांनी केले.

It was astonished to see cleanliness | स्वच्छता पाहून झाले चकित

स्वच्छता पाहून झाले चकित

googlenewsNext
ठळक मुद्देसेवाग्राम रूग्णालयास भेट : मेळघाटात आरोग्य सेवा द्या

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : महाराष्ट्रातील अनेक रूग्णालये मी पाहिले आहे पण सेवाग्राम येथील कस्तुरबा दवाखाना मला सुसज्ज दिसून आला. सर्व व्यवस्था आणि स्वच्छता या ठिकाणी मला दिसल्याने ग्रामीण भागातील रूग्णालयाची व्यवस्था पाहून आनंद झाला असे प्रतिपादन आ. बच्चू कडू यांनी केले.
शनिवारी महात्मा गांधी आश्रमाला भेट देण्यासाठी ते सेवाग्राम येथे आले असता त्यांनी कस्तुरबा रूग्णालयाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नेत्र विभाग प्रमुख डॉ. अजय शुक्ला यांनी सुतगुंडीने आ.बच्चू कडू यांचे स्वागत केले. आ.कडू यांनी स्त्री रोग व प्रसूती विभाग व वार्ड, मेडीसीन विभाग, अतिदक्षता वार्ड, प्रयोगशाळा आदीची पाहणी करून माहिती जाणून घेतली.
सेवाग्राम रूग्णालयात विदर्भासह मध्यप्रदेश, छतीसगड, तेलगंणा राज्यातून मोठ्या प्रमाणावर रूग्ण येतात. त्यांना योग्य सुविधा व उपचार दिले जातात. तसेच या योजनेमुळे ग्रामीण भागातील रूग्णांना कसा लाभ मिळतो याची माहिती दिली. डॉ. उल्हास जाजू यांनी वार्षिक आरोग्य विमा कार्ड या योजनेची माहिती तसेच संस्थेतील कार्य व सुविधेची माहिती दिली. यावेळी आ.बच्चू कडू यांनी मेळघाट भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव वास्तव्य करतात. त्यांना अशा प्रकारची सुविधा मिळाल्यास अधिक चांगले होईल. संस्थेने या दृष्टीने प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
मेळघाट मध्ये रूग्णालयाचे युनिट सुरू असल्याचे आ. कडू यांना सांगण्यात आले. या प्रसंगी रूग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी गिरीश देव, डॉ. समीर येलवटकर, डॉ. सुरेखा तायडे, डॉ. अमर टेंभरे, रंजना मिश्रा आदी डॉक्टर उपस्थित होते.

बच्चू कडू यांची आश्रमाला भेट
महात्मा गांधी यांच्या आश्रमाला आ.बच्चू कडू यांनी शनिवारी ११.३० च्या सुमारास भेट दिली. आश्रमातील आदी निवास, बा व बापू कुटी आदी स्मारकांची पाहणी केली. माहिती जाणून घेतली. बापू कुटीत सर्व धर्म प्रार्थना करण्यात आली. गांधीजींचे कार्य सर्व सामान्यापासून सुरू झाले. त्यांची चळवळ अहिंसेवर आधारित होती. गांधी आश्रमात ते नतमस्तक झाले. नक्कीच यातून प्रेरणा मिळणार यात शंका नाही.
आश्रमातील स्मारकांची माहिती मार्गदर्शिका प्रभा शहाणे यांनी दिली. याप्रसंगी ग्रा.पं.चे उपसरपंच संजय गवई,सदस्य मुन्ना शेख आदीसह आश्रम व प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मोठी गर्दी दिसून आली.

Web Title: It was astonished to see cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.