पालिकेची टाळाटाळ अन् जि.प.चा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:33 PM2018-11-19T22:33:44+5:302018-11-19T22:34:09+5:30

शहरात अद्यावत सांस्कृतिक भवन उभारण्याकरिता २५ कोटींचा निधी उपलब्ध झाला. याची जबाबदारी सुरुवातीला पालिकेकडे सोपविण्यात आली; पण पालिकेने जागेच्या शोधातच आपला वेळ दवडल्याने सांस्कृतिक भवनाचा प्रश्न खितपत पडला होता. अखेर जिल्हा परिषदेने जागा उपलब्ध करुन देत महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरात सांस्कृ तिक संकुल उभारण्याचा निर्णय घेतला. याबाबत जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत सोमवारी सर्वानुमते ठरावही पारीत करण्यात आला आहे.

Initiatives of the prevention and control of the Municipal Corporation | पालिकेची टाळाटाळ अन् जि.प.चा पुढाकार

पालिकेची टाळाटाळ अन् जि.प.चा पुढाकार

Next
ठळक मुद्देसांस्कृतिक संकुल : गांधी विद्यालयाच्या परिसरात साकारण्याचा स्थायी समितीत ठराव पारित

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरात अद्यावत सांस्कृतिक भवन उभारण्याकरिता २५ कोटींचा निधी उपलब्ध झाला. याची जबाबदारी सुरुवातीला पालिकेकडे सोपविण्यात आली; पण पालिकेने जागेच्या शोधातच आपला वेळ दवडल्याने सांस्कृतिक भवनाचा प्रश्न खितपत पडला होता. अखेर जिल्हा परिषदेने जागा उपलब्ध करुन देत महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरात सांस्कृ तिक संकुल उभारण्याचा निर्णय घेतला. याबाबत जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत सोमवारी सर्वानुमते ठरावही पारीत करण्यात आला आहे.
शहरात अद्यावत सांस्कृतिक सभागृह उभारण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून प्रलंबीत होती. यासाठी शहरातील विविध संघटना व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यानंतर वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष बाब म्हणून सांस्कृतिक भवनासाठी २५ कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला. यातील ५ कोटी रुपये सांस्कृतिक मंत्रालयाकडून दिले जाणार असून उर्वरित निधी वित्त मंत्रालयाकडून दिला जाणार आहे.
हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आला असून नगर पालिका यासाठी जागा उपलब्ध करुन देणार होती; पण नगर पालिकेकडून जागाच उपलब्ध झाली नसल्याने अखेर जिल्हा परिषदने सांस्कृतिक संकुल उभारण्यासाठी पुढाकार घेतला. जिल्हा परिषदच्या सभागृहात झालेल्या स्थायी समितीत जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी यांनी सांस्कृतिक संकुलाचा मुद्दा उपस्थित केला. बसस्थानकालगत असलेल्या महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरात हे संकुल उभारण्याबाबत सभागृहाने सर्वानुमते ठराव पारीत केला आहे.
त्यामुळे आता शहरातील सांस्कृतिक संकुल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या समितीच्या बैठकीला जिल्हा परिषदेच्या सभागृहात जि. प. अध्यक्ष नितीन मडावी, मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी विवेक इलमे, विपूल जाधव, शिक्षण व आरोग्य समिती सभापती जयश्री गफाट, महिला व बालकल्याण समिती सभापती सोनाली कलोडे, समाजकल्याण समिती सभापती निता गजाम यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य व सर्व विभागांच्या प्रमुखांची उपस्थिती होती. जागेसाठी अडकेलेला हा विषय अखेर आज मार्गी लागला, हे विशेष.
गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबविणार
जिल्ह्यात गोवर रुबेला लसिकरण मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यासंदर्भातही सभागृहात चर्चा करण्यात आली. या मोहिमेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवून मोहिम यशस्वीकरण्यासाठी जिल्हा परिषद सर्कलमधील जिल्हा परिषद सभापती, सदस्य तसेच पंचायत समिती सर्कलमधील पंचायत समिती सभापती, सदस्य, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य आणि नगरपालिका क्षेत्रातील नगराध्यक्ष व नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा. स्थानिक लोकप्रतिनिधींचा विचारात घेऊन सर्वांना सोबत घेऊन या मोहिमेचा कार्यक्रम आखावा आणि त्यानुसार यशस्वीरित्या पार पडण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

स्थायी समितीच्या बैठकीत अद्यावत सांस्कृतिक सकुलाकरिता जागा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला आहे. महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरातील जिल्हा परिषदेच्या जागेवर हे संकुल उभारण्यात येणार आहे. वेळ पडल्यास नियमानुसार रक्कमही भरण्यात येईल कारण यामुळे जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीस मदत मिळणार आहे.
- नितीन मडावी, अध्यक्ष, जिल्हा परिषद, वर्धा.

Web Title: Initiatives of the prevention and control of the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.