गोड बोलल्यास ‘हेल्दी’ वातावरणाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 10:05 PM2019-01-21T22:05:52+5:302019-01-21T22:06:12+5:30

चांगले आणि गोड बोलणे ही सध्याच्या धकाधकीच्या जीवनातील एक चांगली सवय आहे. या सवयीची अनेक फायदे असून गोड बोलल्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात व कुटुंबात ‘हेल्दी’ वातावरणाची निर्मिती होते.

If you say sweet, 'healthy' atmosphere creation | गोड बोलल्यास ‘हेल्दी’ वातावरणाची निर्मिती

गोड बोलल्यास ‘हेल्दी’ वातावरणाची निर्मिती

Next
ठळक मुद्देमनोहर चव्हाण यांचा सल्ला

चांगले आणि गोड बोलणे ही सध्याच्या धकाधकीच्या जीवनातील एक चांगली सवय आहे. या सवयीची अनेक फायदे असून गोड बोलल्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात व कुटुंबात ‘हेल्दी’ वातावरणाची निर्मिती होते. त्यामुळे प्रत्येकाने नेहमी गोड आणि चांगले बोलले पाहिजे, असे तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी सांगितले. दिवसभऱ्यात जी लोक आपल्याला भेटतात त्यांच्याशी आपण सहानुभूतीपूर्वक आणि गोड बोलले तर तक्रारकर्त्यांची समस्या अधिकाºयाला सहज जाणता येते. शिवाय ती झटपट निकाली काढण्यास मदतही होते. गोड बोलल्यामुळे अनेकांच्या समस्या आपल्याला सहज सोडविण्याची सकारात्मक उर्जा प्राप्त होते. शिवाय ताण-तणावही निर्माण होत नाहीत. संत व महापुरुषांनी प्रेमाने सर्वांना आपलेसे करता येते असे सांगितले आहे. ते सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे. शिवाय ते तणावमुक्त जीवन जगण्यासाठी महत्त्वाचेही आहे. तसा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञही देतात. गोड व पे्रमाने इतरांशी बोलल्यास ज्या ठिकाणी आपण काम करतो तेथे हेल्दी वातावरणाची निर्मिती होते. शिवाय गोड बोलल्याचा सर्वाधिक फायदा मानवी समाजालाच होत असल्याचे यावेळी तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी स्पष्ट केले.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणूस हा माणसापासून दूर जात आहे. पैसा, संपत्तीच्या मोहात मनुष्य काही प्रमाणात सामाजिक बांधिलकी विसरत असल्याचे दिसून येते. या विदारक परिस्थिती मात करण्यासाठी लोकमतचा हा उपक्रम फायद्याचा ठरणारा आहे. गोड बोलून अनेकांची आपलेसे करता येत असल्याने तसा प्रयत्न प्रत्येकाने करावा, असे चव्हाण म्हणाले.

Web Title: If you say sweet, 'healthy' atmosphere creation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.