घरघुती पाणी मापक मीटरची तपासणी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:35 PM2017-11-19T23:35:34+5:302017-11-19T23:36:10+5:30

गत सहा महिन्यांपूर्वी स्थानिक ग्रा.पं.ने परिसरातील नळांना मीटर लावले. त्यावरिल रिडींग वरून नागरिकांना पाणी वापराचे देयकही दिल्या जाते.

Home Improvement Metering Check Expedition | घरघुती पाणी मापक मीटरची तपासणी मोहीम

घरघुती पाणी मापक मीटरची तपासणी मोहीम

googlenewsNext
ठळक मुद्देदहा जणांना दंड : ग्रामपंचायतची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : गत सहा महिन्यांपूर्वी स्थानिक ग्रा.पं.ने परिसरातील नळांना मीटर लावले. त्यावरिल रिडींग वरून नागरिकांना पाणी वापराचे देयकही दिल्या जाते. परंतु, अनेक जण मीटरमध्ये तांत्रिक बिघाड तयार करून ग्रा.पं.चा महसूल बुडवित असल्याची माहिती मिळताच ग्रा.पं.च्यावतीने मीटर तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेदरम्यान काही अनुचित प्रकार समोर आल्यामुळे दहा जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली.
घोराड येथील नागरिकांना नळ योजनेंतर्गत पाणी पुरवठा केला जातो. ही योजना सुरू करताना पाण्याचा अपव्यय होऊ नये म्हणून नळांना मीटर बसविण्यात आले. गत काही महिन्यापासून सदर मीटरचे रिडींग घेऊन नागरिकांना युनिट प्रमाणे देयकही देण्यास सुरुवात झाली; पण नळाला लावलेले मीटर सुस्थितीत आहे किंवा नाही याची शाहनिशा करण्यात येत नव्हती. दरम्यान सरपंच ज्योती घंगारे, ग्रामविकास अधिकारी संजय धावडे, पं. स. सदस्य अमीत तेलरांधे, पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष गणेश खोपडे, सचिव रामेश्वर घंगारे, ग्रा.पं. सदस्य गोपाळ माहुरे, गणेश महाजन, प्रशांत वैरागडे यांनी नळावरील मिटर तपासणीची मोहीम राबविली. यात दहा जणांच्या मिटरमध्ये बिघाड आढळून आल्याने त्यांना दंड ठोठावण्यात आला. ग्रामपंचातीच्यावतीने राबविण्यात आलेल्या सदर मोहिमेत ग्रा. पं. कर्मचारी दिवाकर माहुरे, प्रविण मस्के, सागर भांदककर आदी सहभागी झाले होते.
अनेक गैरप्रकार चव्हाट्यावर
राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान काही नागरिकांनी मिटरमध्ये सुईने छीद्र करून मिटर बंद केल्याचे, मिटर काढून पाणी वापरण्यात येत असल्याचे, मिटर जोडणीच्या सुरुवातीला टी लावून पाणी वापरत असल्याचे आढळून आले. यावेळी दोषी आढणाºया दहा जणांविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.

Web Title: Home Improvement Metering Check Expedition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.