नोटाबंदीचा विरोध : विविध मागण्यांचे निवेदन सादर
हिंगणघाट : नोटाबंदीच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा निषेध नोंदविण्याकरिता येथे राष्ट्रवादी काँगे्रसच्या पदधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
निवेदनामध्ये नोटाबंदीच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. सोतबच मायक्रोफॉयनान्सचे कर्ज माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य दर देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात माजी आमदार राजू तिमांडे, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.(तालुका प्रतिनिधी)

वर्धेतही निषेध आंदोलन
४वर्धा - या निषेध धरणे आंदोलनात राकाँचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, डॉ. किशोर अहेर, पं.स. उपसभापती संदेश किटे, नगरसेवक मुन्ना झाडे, विजयसिंह गुलाबसिंह बघेल, बाबुजी ढगे, लक्ष्मीकांत सोनवणे, प्रदीप मेघे, विद्या सोनटक्के, शारदा केने, पिपरी (मेघे) येथील सरपंच कुमूद लाजूरकर, ग्रा.पं. सदस्य अजय गौळकर यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा
४वर्धा - महिला काँग्रेसच्या आंदोलकांकडून उपजिल्हधिकारी लोणकर यांनी निवेदन स्वीकारले. त्यांनी महिलांकडूून माहितीही जाणून घेतली. जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना त्या समस्यांवर चर्चाही करण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या मागण्या वरिष्ठांकडे सोपविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला कॉँग्रेसच्या उपाध्यक्षा पुष्पा नागपुरे तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला कॉँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी उषा उताने उपस्थित होत्या. तसेच वर्धा जिल्हा महिला कॉँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष विभा ढगे, सुरेखा किटे, कुंदा भोयर, रंजना पवार, निलीमा दंडारी, रोशना जानळेकर, मंगला इंगळे, लढी, अर्चना मून, राजश्री देशमुख, गायधने, शालू इवनाथे, पुष्पा लांबट, प्रमीला भूसारी, प्रभा जाधव, निलीमा दंडारे, रेखा भगत व मोठ्या संख्येने कॉँग्रेस कमिटीच्या महिला उपस्थित होत्या.(प्रतिनिधी)