शंभर कोटी मिळाले; जिल्हा बॅँकेचे विलिनीकरण कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:44 AM2019-02-16T00:44:26+5:302019-02-16T00:45:38+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती खालावल्याने बँकेचे दिवाळे निघाले. परिणामी शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे आर्थिक व्यवहारही ठप्प झाले आहे. त्यामुळे या बँकेचे राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण करावे, अशी.....

Got 100 crores; When did the district bank merge? | शंभर कोटी मिळाले; जिल्हा बॅँकेचे विलिनीकरण कधी?

शंभर कोटी मिळाले; जिल्हा बॅँकेचे विलिनीकरण कधी?

Next
ठळक मुद्देभोयर यांचा प्रश्न : राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती खालावल्याने बँकेचे दिवाळे निघाले. परिणामी शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे आर्थिक व्यवहारही ठप्प झाले आहे. त्यामुळे या बँकेचे राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण करावे, अशी मागणी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी लाऊन धरल्याने बँकेच्या विलिनीकरणाची प्रक्रिया सुरु झाली. परंतु राज्य सहकारी बँकेने शासनाकडे १०० कोटीची मागणी केली होती. ती मागणीही शासनाने मान्य करीत १०० कोटीचे अर्थसाहाय्य केले. तरीही बँकेचे विलिनीकरण झाले नसल्यामुळे ते कधी होणार? असा प्रश्न आमदार डॉ. पंकज भोयर यांनी राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत उपस्थित केला.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विलिनीकरण प्रक्रियेसदर्भात मुंबई येथे राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार डॉ. पंकज भोयर यांच्यासह राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनासकर, प्रशासकीय मंडळ समितीचे सदस्य संजय भेंडे व अविनाश महागावकर, व्यवस्थापकीय संचालक अजित देशमुख उपस्थित होते. या बैठकीत विलिनीकरणासंदर्भात आमदार भोयर यांनी अधिकाºयांशी सविस्तर चर्चा केली.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तत्कालीन संचालकांच्या बेजबाबदार पणामुळे ग्रामीण भागाचा कणा असलेली बँक डबघाईस आली. या जिल्हा सहकारी बँकेचे २ लाख १७ हजार ५३८ ग्राहक असून त्यांचे बँकेकडे ३५५.४४ कोटी रुपये थकले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा घामाचा पैसा त्यांना परत मिळावा तसेच शेतकºयांनाही सहज आणि सुलभरित्या पिककर्ज पुरवठा व्हावा. या करिता जिल्हा सहकारी बँकेच्या विलिनीकरणाची प्रक्रिया जलदगतीने पार पाडवी, अशी सूचनाही आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केली. वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विलिनीकरणाची प्रक्रिया सुरु असून यावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी मुख्य प्रशासक अनासकर यांनी दिले. त्यामुळे लवकरच बँक पुन्हा चांगल्या स्थितीत येईल, असा आशावादही आमदार डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केला.

Web Title: Got 100 crores; When did the district bank merge?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.