वर्धा कला महोत्सव : वर्धेचा श्याम शिंदे प्रथम तर बुलडाण्याचा अंध स्पर्धक बाभुळकर द्वितीय
वर्धा : वर्धा कला महोत्सव समिती व दत्ता मेघे फाऊंडेशनद्वारा आयोजित वर्धा कला महोत्सव २०१७ मधील गीतगायन स्पर्धेला कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विदर्भातून आलेल्या ७४ गायकांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. स्पर्धेचा विजेता वर्धेचा श्याम शिंदे ठरला. भगवान बाभुळकर यांनी द्वितीय व अवंतिका ढुमणे हिने तृतीय पुरस्कार प्राप्त केला.
स्पर्धेत प्रणय बहादुरे, श्रेयस मसुरकर, स्वप्नील मेश्राम, अल्हाद काळे, बालू हरणे यांना प्रोत्साहन, तर पुर्वत भिरंगे, रिना गायधने, कृष्णा मदान, सक्षम मोहन, दुष्यंत श्रूंगारे, योगेश तांबे, नम्रता तावडे, प्रविण इंगोले, अनिल भालेराव, अक्षय भैसारे, प्रकाश वाळके, निलेश पानतावने, वैभव परदेशी यांना विशेष प्रोत्साहन प्राप्त झाले. उद्घाटन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांच्या हस्ते मोहन अग्रवाल यांच्या अध्यक्षतेत झाले. अतिथी म्हणून डॉ. दुर्योधन चव्हाण, डॉ. सचिन पावडे, संदीप चिचाटे, आशिष गोस्वामी, अभिजीत श्रावणे, संजय उगेमुगे, अलोक विश्वास, सचिन प्रजापती, विलास आकरे, सुनील गावंडे, उमेशसिंग सेंगर, यशवंत पलेरिया, सुरेश बरे, प्रशांत वकारे, प्रवीण शेंडे, विशाल दंडमवार, शेख नाजीम, नलिनी चिचाटे, मंदा वांदिले, रवी समुद्रे, संजय वरटकर, निलेश किटे, अजय झाडे, रसिक जोमदे, पवन राऊत, गौरव जाधव, अनिल कुकर्डे, तेजस तवरे, अजय ठाकरे, प्रफुल गायकवाड आदी उपस्थित होते. ाहआयोजन प्रगती संगीत विद्यालय यांनी केले. तबल्यावर विशाल पांडे, पेटीवर शैलेश देशमुख, आॅर्गनवर सचिन घुडे, पॅडवर राजेंद्र झाडे व गिटारवर संजय मशानकर यांनी साथ दिली. संचालन शिला बिडकर, परिक्षण अप्रेमेय मिश्रा दिल्ली, खुशबू कठाणे पुणे यांनी केले. अंतीम फेरीत जिस मोड से आये है, धीरे धीरे जाये बदरीया, अभंग, गजल, मन्नाडे यांनी गायलेली गाणी, सुफी संगीत, राष्ट्रीय आदी गीतांवर तरूणाई डोलू लागली.(कार्यालय प्रतिनिधी)