वर्धा  नजीक रसायनयुक्त पाणी पिल्याने बकऱ्या  दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 03:08 PM2017-11-23T15:08:14+5:302017-11-23T15:09:57+5:30

रसायनयुक्त पाणी पिल्याने तीन बकऱ्या  दगावल्याची घटना नजीकच्या आमगाव (ख.) शिवारात घडली. यामुळे शेळीपालक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याला आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.

Goats death due to drinking chemical water near Wardha | वर्धा  नजीक रसायनयुक्त पाणी पिल्याने बकऱ्या  दगावल्या

वर्धा  नजीक रसायनयुक्त पाणी पिल्याने बकऱ्या  दगावल्या

Next
ठळक मुद्देआमगाव(ख.) येथील घटना : शेळीपालकाचे नुकसान

आॅनलाईन लोकमत
वर्धा : रसायनयुक्त पाणी पिल्याने तीन बकऱ्या  दगावल्याची घटना नजीकच्या आमगाव (ख.) शिवारात घडली. यामुळे शेळीपालक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याला आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.
बलवंता बोरजे हे आपल्या बकऱ्या  चारण्यासाठी घेऊन गेले होते. दरम्यान गावालगतच्या कंपनीने नाल्यात सोडलेले रसायनयुक्त पाणी काही बकऱ्या  पिल्या. त्यामुळे बकऱ्यांची प्रकृती बिघडून त्यात तीन बकऱ्यांचा मृत्यू झाला. एका बकरीची प्रकृती गंभीर असून सदर रासायनयुक्त पाणी पिल्यामुळे तिच्या दोन पिल्लांवरही त्यांचे परिणाम जाणवत आहेत. यापूर्वीही २००५ मध्ये सदर कंपनीने दुषीत पाणी सोडले होते. रसायनयुक्त पाणी कुठेही सोडू नये असे क्रमप्राप्त असताना हा प्रकार घडत आहे. रसायनयुक्त पाणी पिल्यामुळे बकऱ्या  दगावून झालेल्या नुकसानीची शेळीपालकाला तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी आहे.
नुकसान भरपाई द्यावी
नाल्याच्या परिसरात लहान मुले खेळत असून रसायनयुक्त पाणी नाल्यात सोडणे हे निंदनिय आहे. हा प्रकार एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला आमंत्रण देणारा असल्याने जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करावी. शिवाय सदर शेळीपालकाला त्वरित नुकसान भरपाई द्यावी.
 कैलासआप्पा वाघमारे
जिल्हाध्यक्ष, बसव ब्रिगेड, वर्धा.

Web Title: Goats death due to drinking chemical water near Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू