वस्तीत घुसलेल्या साळींदराला दिले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 10:12 PM2018-10-20T22:12:26+5:302018-10-20T22:13:10+5:30

अंगावर काटे असलेल्या विचित्र प्राण्याने श्वान मागे लागल्याने सैरावैर पळत नालीत आश्रय घेतल्याचे येथील कृष्णनगर येथील काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी सदर घटनेची माहिती पिपल फॉर अ‍ॅनिमल्सच्या पदाधिकाऱ्यांना दिली.

Given the life given to the thug | वस्तीत घुसलेल्या साळींदराला दिले जीवदान

वस्तीत घुसलेल्या साळींदराला दिले जीवदान

Next
ठळक मुद्देश्वानांपासून बचावार्थ नालीत घेतला आश्रय

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अंगावर काटे असलेल्या विचित्र प्राण्याने श्वान मागे लागल्याने सैरावैर पळत नालीत आश्रय घेतल्याचे येथील कृष्णनगर येथील काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी सदर घटनेची माहिती पिपल फॉर अ‍ॅनिमल्सच्या पदाधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या या कार्यकर्त्यांना सदर विचित्र प्राणी साळींदर असल्याचे निदर्शनास आले. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर त्याला ताब्यात घेऊन जीवदान देण्यात आले. सध्या हा प्राणी पिपल फॉर अ‍ॅनिमल्सच्या करुणाश्रमात ठेवण्यात आले आहे.
स्थानिक कृष्णनगर भागातील एकता चौक परिसरात रात्री २ वाजताच्या सुमारास अंगावर काटे असलेला प्राणी श्वानापासून आपला जीव वाचविण्यासाठी सैरावैर पळत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी श्वानांना हाकलून लावत त्याबाबतची माहिती तात्काळ पिपल फॉर अ‍ॅनिमल्सच्या कार्यकर्त्यांना दिली. माहिती मिळताच पिपल फॉर अ‍ॅनिमल्सचे आशीष गोस्वामी, किरण मोकादम, कौस्तुभ गावंडे यांनी घटनास्थळ गाठले. याप्रसंगी परिसरातील नागरिकांच्या मदतीने सतत दोन तास केलेल्या प्रयत्नाअंती नालीत आश्रय घेतलेल्या साळींदराला ताब्यात घेण्यात आले. मदत कार्यात कविता व रविकांत बालपांडे, सातपुते, वनश्री आवते, संजय आवते, मोनिका सातपुते, महेंद्र मेश्राम, इंगोले, शार्दूल वंदीले, लकी इंगोले आदींनी सहकार्य केले.

साळींदरला सोडणार नैसर्गिक अधिवासात
सदर घटनेची माहिती पिपल फॉर अ‍ॅनिमल्सच्या कार्यकर्त्यांनी उपवनसंरक्षक सुनील शर्मा यांना दिली. सदर वन्य जीवाला दिवसाला दिसत नसल्याने व सुरक्षीत जागी सोडणे शक्य नसल्याने यास तात्पुरते पिपरी (मेघे) येथील करुणाश्रमात ठेवण्यात आले आहे. त्याला वन विभागाच्या अधिकाºयांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री उशीरा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
साळींदरबाबत अनेक गैरसमज
समाजात साळींदर या वन्य प्राण्याबाबत अनेक गैरसमज आहेत. याच्याबद्दल सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे साळू आपले काटे शत्रूच्या अंगावर फेकते. साळींदर काटे फेकते म्हणजे स्वत:च्या संरक्षणासाठी तो आपल्या अंगावरील काटे एकदम फुलवून वेगाने उलटे धावतो. हे काटे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून चक्क साळूचे वाढुन लांब आणि कडक झालेले केस असतात.

Web Title: Given the life given to the thug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.