वर्धा जिल्ह्यात विहिरीत पडून पाच रोह्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:27 PM2018-02-23T12:27:36+5:302018-02-23T12:32:14+5:30

जंगलातील वण्यप्राण्यांची तहाण भागविण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. दोन दिवसांत पाच रोह्यांना पाण्याकरिता आपला जीव गमवावा लागला आहे.

Five blue bull died in well in Wardha district | वर्धा जिल्ह्यात विहिरीत पडून पाच रोह्यांचा मृत्यू

वर्धा जिल्ह्यात विहिरीत पडून पाच रोह्यांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देअंतरगाव, धोंडगाव शिवारात घटनापाण्याच्या शोधात प्राण्यांची भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लगतच्या जंगलातील वण्यप्राण्यांची तहाण भागविण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. दोन दिवसांत पाच रोह्यांना पाण्याकरिता आपला जीव गमवावा लागला आहे.
प्राप्त माहितीनुसार २० फेबु्रवारी रोजी अंतरगाव शिवारातील संजय मोंढे यांच्या शेतातील विहिरीत पडून एका रोह्याचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर बुधवारी धोंडगाव शिवारातील राजू थुटे यांचे शेतातील विहिरीवर रात्रीच्या सुमारास रोह्यांचा कळप तृष्णातृप्तीसाठी आला असता पाच ते सहा महिने वयाच्या चार रोह्यांची पिल्लं विहिरीत पडली. यातच त्यांचा मृत्यू झाला. गुरूवारी शेतकरी राजू थुटे हा शेतात गेला असता ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. याबाबत त्यांनी गिरड येथील सहायक वनपरिक्षेत्र कार्यालयाला माहिती दिली.
माहिती मिळताच सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी आडकिने, वनरक्षक उरकुडे, खुशाल धारणे, अशोक वासिमकर, अनिल जुमडे यांनी शेतशिवार गाठून विहिरीत पडलेल्या रोह्यांच्या चार पिल्लांना ट्रॅक्टरच्या साह्याने बाहेर काढले.
वनविभागाच्या वाहनातून मृत रोह्यांवर मोहगाव जंगलातील नर्सरीमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश राघोते यांनी शवस्वछेदन केले. चारही रोह्यांच्या पिल्लांना तेथेच जमिनीत पूरण्यात आले.

Web Title: Five blue bull died in well in Wardha district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.