वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे फटाक्याच्या दुकानांना भीषण आग; जीवितहानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 10:19 AM2018-11-08T10:19:48+5:302018-11-08T10:31:09+5:30

पुलगाव येथील नाचणगाव-पुलगाव रेल्वे रोडवर असलेल्या मुख्य बाजारपेठेत दिवाळीनिमित्त लावलेल्या फटाक्याच्या दुकानांना बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास अचानक भीषण आग लागली.

fireworks shops caught fire at Pulgaon in Wardha district; No lien | वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे फटाक्याच्या दुकानांना भीषण आग; जीवितहानी नाही

वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे फटाक्याच्या दुकानांना भीषण आग; जीवितहानी नाही

Next
ठळक मुद्देकरोडोंच्या वित्तहानीचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: पुलगाव येथील नाचणगाव-पुलगाव रेल्वे रोडवर असलेल्या मुख्य बाजारपेठेत दिवाळीनिमित्त लावलेल्या फटाक्याच्या दुकानांना बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत फटाक्यांची सहा दुकाने व त्यामागे असलेली काही घरे जळून भस्मसात झाली. आगीचे वृत्त कळताच पुलगाव, वर्धा, आर्वी येथून अग्निशामक दलाचे बंब व अन्य यंत्रणा घटनास्थळी तात्काळ पोहचली. सुमारे अडीच तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
 

Web Title: fireworks shops caught fire at Pulgaon in Wardha district; No lien

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग