उन्हाळवाहीच्या कामांसाठी शेतकऱ्यांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 11:58 PM2019-06-12T23:58:13+5:302019-06-12T23:58:59+5:30

खरीप हंगाम एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. एप्रिल महिन्यात शेतजमिनी रिकाम्या करून शेतकऱ्यांनी काडीकचऱ्यांची विल्हेवाट लावली. आता मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आपल्या जमिनीत तयार करून ठेवावयाच्या आहेत.

Farmers' work for summer work | उन्हाळवाहीच्या कामांसाठी शेतकऱ्यांची लगबग

उन्हाळवाहीच्या कामांसाठी शेतकऱ्यांची लगबग

Next
ठळक मुद्देमेंढपाळांचा शोध सुरू : शेणखताच्या मागणीतही झाली वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी): खरीप हंगाम एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. एप्रिल महिन्यात शेतजमिनी रिकाम्या करून शेतकऱ्यांनी काडीकचऱ्यांची विल्हेवाट लावली. आता मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आपल्या जमिनीत तयार करून ठेवावयाच्या आहेत. यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून उन्हाळवाहीच्या कामांना ग्रामीण भागात वेग आल्याचे दिसून येत आहे. कुणी मेंढपाळांचा शोध घेताना दिसतो तर कुणी शेणखताची तरतूद करीत असल्याचे दिसते.
खरिपात चांगले उत्पादन घेता यावे म्हणून उन्हाळ्यातच शेतकऱ्यांना जमिनी तयार कराव्या लागतात. काडी-कचऱ्याची विल्हेवाट लावण्यानंतर वखरणी, नांगरणी करून मातीची उलथापालथ केली जाते. सध्या शेतकऱ्यांची उन्हाळवाहीची कामे सुरू झाली आहे. यासोबतच शेणखताची तरतूद केली जात असून काही शेतकरी मेंढपाळांच्या शोधात असल्याचे दिसते.
चांगल्या शेणखताचे भाव वधारले
खरीप हंगामाकरिता शेतजमीन तयार करताना शेणखताला महत्त्व दिले जाते. जमिनीचा पोत सुधारण्याकरिता शेणखत गरजेचे असते; पण सर्वच शेतकऱ्यांना शेणखत मिळेल, असे नाही. चांगल्या प्रतीच्या शेणखताचे भावही सध्या वधारलेले आहेत. शेणखताच्या एका ट्रॉलीसाठी शेतकऱ्यांना तब्बल २ हजार ५०० रुपये मोजावे लागत असून मजूर व वाहतुकीसाठी एक हजार रुपये अतिरिक्त खर्च करावे लागतात. यामुळे काहीच शेतकरी हा प्रयोग करतात.
एक एकराला लागते तीन ट्रॉली खत
शेणखताचा शेतात वापर करावयाचा झाल्यास एका एकर शेतामध्ये सुमारे तीन ते चार ट्रॉली शेणखत टाकावे लागते. चांगल्या खतासाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरू असल्याचे दिसते. शेणखतामुळे जमिनीचा पोत वाढत असून उत्पादनातही वाढ होते.
शेणखत महाग असून अधिक प्रमाणात मिळत नसल्याने बहुतांश शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात. या खतांमुळे जमिनीचा पोत घसरत असल्याचे कृषी विभाग सांगतो. यामुळे उत्पादनात घट होत असल्याने शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे आवाहन तज्ज्ञ करतात.
मेंढ्यांचा दर दोन हजार रुपये
मेंढ्यांचे मल-मूत्रही शेतजमिनीची पोत वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते. यामुळे शेतकऱ्यांकडून मेंढपाळांचा शोध घेतला जातो. मेंढपाळांचे दरही वाढले असून ते एका रात्रीचे २ हजार रुपये घेतात. एका मेंढपाळाकडे सुमारे १ हजार २०० मेंढ्या असतात.
पशुधनात होतेय घट
शेतीत ट्रॅक्टरचा वापर होत असल्याने पशुधनात घट होत आहे. जिल्ह्यात मोठी जनावरे २ लाख ४० हजार १४४ तर लहान जनावरे १ लाख ३२ हजार २७ आहेत.

Web Title: Farmers' work for summer work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.